

Apple iPhone Fold Leaks: 2 Major Features Missing from Apple's First Foldable Phone
esakal
iPhone fold missing features leak: टेक जगतातील दिग्गज कंपनी Apple आपल्या पहिल्यावहिल्या फोल्डेबल आयफोनच्या (iPhone Fold) लाँचिंगसाठी सज्ज होत आहे. युजर्स गेल्या अनेक वर्षांपासून Appleच्या प्रीमियम फोनची वाट पाहत आहेत. कंपनी हा फोल्डेबल फोन अत्यंत आकर्षक डिझाइन, दणकट हिंज आणि मोठ्या इनर डिस्प्लेसह बाजारात आणणार आहे.
पण, 'ब्लूमबर्ग'च्या (Bloomberg) अहवालानुसार, या फोनसाठी युजर्सना मोठी किंमत मोजावी लागणार असूनही, सध्याच्या फ्लॅगशिप आयफोन मॉडेलमध्ये मिळणारे 2 अतिशय महत्त्वाचे फीचर्स या फोल्डेबल आयफोनमध्ये मिळणार नाहीत. या फोनची संभाव्य किंमत, लाँचिंगची वेळ आणि गायब असणाऱ्या 2 फीचर्सची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे-