esakal | Apple पुढील वर्षी लॉंच करणार सगळ्यात स्वस्त 5G iPhone
sakal

बोलून बातमी शोधा

Apple

Apple पुढील वर्षी लॉंच करणार सगळ्यात स्वस्त 5G iPhone

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सगळ्या जगात Apple चे आयफोन प्रसिध्द आहेत. मात्र या आयफोनच्या किंमती मात्र सगळ्यांना परवडणाऱ्या नाहीत नाहीत. कंपनीने सामान्य ग्राहकांसाठी विशेष तयारी सुरु केली आहे. पुढील वर्षी Apple सामान्य ग्राहकांना देखील परवडतील असे Apple 5G फोन बाजारात लॉंच करण्याच्या तयारीत आहे. 2022 च्या सुरुवातीला हा iPhone ग्राहकांसाठी बाजारात उपलब्ध होतील. (apple to launch cheapest 5g iPhone early next year)

ग्राहक iPhone SE ही नवीन 5G iPhone आवृत्ती 2022च्या सुरुवातीला खरेदी करु शकतील, असे Nikkei ने प्रसिध्द केलेल्या अहवालात म्हटले आहे. या बजेट आयफोनमध्ये S 15 प्रोसेसर देण्यात येणार असून 5G कनेक्टिव्हिटी ही Qualcomm Inc's X60 मॉडेम चिपद्वारे सक्षम केलेली असेल. या दरम्यान Apple पुढील वर्षी आपल्या iPhone Mini ची अपडेटेड आवृत्ती बाजारात आणणार नाही. iPhone Mini ग्राहकांच्या पसंदीस उतरले नव्हते त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

iPhone SE हा पुढील वर्षाच्या सुरुवातीसनवीन चिपसेट आणि 5 जी फीचर्ससह अपडेट केला जाईल. हा आगामी आयफोन एसई Apple चा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 5 G फोन असेल असा दावा करण्यात येत आहे. (apple to launch cheapest 5g iPhone early next year)

हेही वाचा: आता Netflix च्या ग्राहकांना 'Video games' चाही आनंद घेता येणार

loading image