Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Anand Mahindra downloads Arattai app : आनंद महिंद्रांनी हे ॲप डाउनलोड करून श्रीधर वेम्बू यांना एक खास संदेशही पाठवलाय
Anand Mahindra downloads the Arattai app and messages Sridhar Vembu, boosting India’s homegrown messaging platform.

Anand Mahindra downloads the Arattai app and messages Sridhar Vembu, boosting India’s homegrown messaging platform.

esakal

Updated on

Anand Mahindra’s Support for Arattai App : भारताचं स्वदेशी मेसेंजिंग ॲप Arattaiला देशभरातून हळूहळू पाठिंबा वाढताना दिसत आहे. आता उद्योग जगतामधूनही या स्वदेशी ॲपला मिळाला आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत स्वत: माहिती देत सांगितले आहे की, त्यांनी त्यांच्या फोनमध्ये स्वदेशी Arattai ॲप डाउनलोड केलं आहे आणि ते अभिमानाने याचा वापरही करत आहेत. आनंद महिंद्रांच्या या पुढाकारामुळे या स्वदेशी ॲपचे फाउंडर श्रीधऱ वेम्बू यांचा उत्साह अधिकच वाढला आहे.

आनंद महिंद्र यांनी याबाबत Xवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘’Downloaded Arattai…with pride’’ तर यावर श्रीधर वेम्बू यांनी उत्तर देताना म्हटले की, आनंद महिंद्रा यांचा पाठिंबा त्यांना आणखी जास्त प्रेरित करत आहे.

श्रीधर वेम्बू यांनी सांगितले की, ते आपल्या तेनकासी येथील कार्यालयात Arattaiच्या अभियंत्यांसोबत ॲपमध्ये अधिक सुधारणा करण्यावर काम करत होते आणि तेवढ्यात त्यांच्या एका सहकाऱ्याने आनंद महिंद्रा यांनी केलेल्या ट्वीटबाबत त्यांना माहिती दिली. यावर वेम्बू यांनी आनंद महिंद्रा यांच्या ट्वीटला उत्तर देताना म्हटले की, धन्यवाद, आनंद महिंद्राजी. यामुळे आम्हाला अधिक जास्त दृढनिश्चय लाभतो आहे.

Anand Mahindra downloads the Arattai app and messages Sridhar Vembu, boosting India’s homegrown messaging platform.
Arattai vs WhatsApp: स्वदेशी ॲप ‘Arattai’ कोणत्या बाबतीत आहे ‘WhatsApp’पेक्षा वरचढ!

यावर मग आनंद महिंद्र यांनीही वेम्बू यांना रिप्लाय केला आणि म्हटले की, "We’re cheering for you, Sridhar Vembu", जे दर्शवते की ते या स्वदेशी उपक्रमास पूर्णपणे पाठिंबा देत आहेत.

एवढंच नाहीतर Arattai बद्दल सोशल मीडियावरही प्रचंड उत्साह दिसत आहे. अनेक युजर्स Arattaiच्या वैशिष्ट्यांचे कौतुक करत आहे. तसेच प्रायव्हसीच्या बाबतीत Arattai हे WhatsApp पेक्षाही कसं वरचढ आहे, याच्याही सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहेत. अनेकांकडून याबाबतीत या स्वदेशी ॲपचं कौतुक केलं जात आहे.

Anand Mahindra downloads the Arattai app and messages Sridhar Vembu, boosting India’s homegrown messaging platform.
FASTag New Rule : आता नाही द्यावा लागणार डबल टोल! 'UPI पेमेंट'ने पैसे वाचणार

शिवाय, श्रीधर वेम्बू यांनीही स्पष्ट केलं आहे की, त्यांचा उद्दिष्ट गोपनीयता अबाधित राखणं आहे आणि ते असं कोणतही बिझनेस मॉडेल स्वीकारणार नाहीत, जे  गोपनीयतेला धोका निर्माण करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com