‘ॲप’निंग :  मोबाईलच्या वापरावर तुमचीच नजर

Apps
Apps

सध्या मोबाईल फोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काहींच्या बाबतीत ते एक व्यसनच झाले आहे. आपण दिवसातून किती वेळ मोबाईलमध्ये अडकून पडलेलो असतो, हे कळत नाही. प्रसंगी आपण ‘मोबाईल ॲडिक्‍ट’ आहोत काय, हे तपासण्याचाही आपण प्रयत्न करत असतो. हे शोधण्याचा सोपा पर्याय म्हणजे ‘युवर अवर्स’ हे ॲप वापरून तुम्ही मोबाईलवर दिवसातले किती तास घालवता हे पाहू शकता. या ॲपमुळे आपल्या मोबाईल वापरासंबंधी भन्नाट निष्कर्ष समोर येतात. आपला मोबाईल फोनचा वापरही हे ॲप मर्यादित करते. सुरुवातीला हे ॲप आपल्याकडून परवानगी घेते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपल्या डेटा वापरामध्ये ‘युवर अवर्स’ ॲपला परवानगी आवश्‍यक असते. ती परवानगी आपण देणे आवश्‍यक आहे. त्यानंतर इतर ॲप वापरण्यासाठीही अनुमती द्यावी लागते. अनुमती घेतल्यानंतर  स्टिकी सूचना वापरून आपण बदलती वेळ, स्वयंचलित मोबाईल लॉक इत्यादी सेट करू शकतो. बदलती वेळ नंतर सेटिंग्जमधून बदलता येते. बदलती वेळ आपण आज किती वेळ मोबाईलवर घालवला हे दाखवते. यानंतर जास्त वापर झाल्यास ‘अलर्ट’ करून आपण ठरविलेल्या मर्यादेपेक्षा मोबाईलचा जास्त वापर केल्याच्या सूचना आपल्याला मिळतात. वापराची मर्यादा सेटिंग्जमधून बदलताही येते. यानंतर मोबाईल वापराची मर्यादा ठरवावी लागते. आपल्या मोबाईल वापराचे तास यातून ठरवावे लागतात. या ॲपचे सर्व अधिकार हे माईंड ई-फाय सोल्युशन इंडिया लि. या कंपनीकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत. ही एक ॲप निर्माता आणि आयटी आउटसोर्सिंग कंपनी आहे. तुमच्या काही अडचणी असतील तर त्या सोडविण्यासाठी ॲपवर मेल किंवा संपर्क करण्यासाठी सुविधाही आहे. आपण मोबाईलवर कोणत्या ॲपवर किती वेळ घालवतो याची इत्थंभूत माहितीही मिळते.

मागील सात दिवस आपल्या फोन वापराचा अभ्यास करून आपल्या ‘मोबाईल व्यसनाधीनते’ची पातळी हे ॲप सांगते. साडेपाच तासांपेक्षा जास्त वापर असेल तर आहारी गेलेले, साडेचार ते साडेपाच तास वापर असेल तर अती वापर असलेले, साडेतीन ते साडेचार तास वापर असेल, तर अवलंबून असलेले, अडीच ते साडेतीन तास वापर असेल तर सवय लागलेले, एक ते अडीच तास वापर असलेले मर्यादित वापर असलेले आणि एक तासांपेक्षा कमी वापर असेल तर तुम्ही जिंकलात अशा प्रकारच्या पातळ्या त्यात असून, आपला ज्या पद्धतीने वापर आहे त्यावरून आपल्याला हे ॲप काही महत्त्वाच्या सूचना करते.

मोबाईलवर घालवलेला वेळ हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे ‘निर्यात’ करता येतो. त्यासाठी प्रिमियम सुविधा असून त्याचे २४९ रुपये सदस्य शुल्क आहे. त्यानंतर आपल्याला ‘युवर अवर्स’ ॲपची प्रिमियम सुविधा उपलब्ध होते. यामध्ये आपल्याला दिनचर्येनुसार दिवसाची प्रारंभाची वेळ सेट करता येते.

आपल्याला पीडीएफ आणि एक्‍सेल स्वरूपात आपले साप्ताहिक आणि मासिक अहवाल निर्यात करता येतात. प्रिमियम सुविधेत कुठल्याही प्रकारची जाहिरात नसते. उपलब्ध सुविधा १) योग्य पद्धतीने आपले चॅलेंजेस काय आहेत हे दर्शविते. २) मोबाईल वापरासंबंधी अनेक पॉइंट्‌सद्वारे सूचना. ३) ‘व्हॉट्‌सॲप’/‘फेसबुक’सारखे ॲप कितीवेळा ओपन केले, याचे आलेख.

ॲप वापराच्या पायऱ्या

  • पहिल्यांदा हे ॲप ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करावे.
  • एका भाषेची निवड करून पुढे जावे. 
  • ॲपच्या वापरासाठी परवानगी द्यावी.
  • इतर ॲप वापरासाठी अनुमती द्यावी.
  • स्टिकी सूचना सक्रिय करावी.
  • बदलती वेळ सक्रिय करावी.
  • जास्त वापर अलर्ट करा.
  • मोबाईल वापराची मर्यादा ठरवा. 
  • नोटिफिकेशन्सचा पर्यायही उपलब्ध.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com