आवाज ऐकून कळू शकेल व्यक्तीच्या भविष्यातील मानसिक आजार!

artificial intelligence tool can predict psychosis risk from your speech
artificial intelligence tool can predict psychosis risk from your speech

आता कोणत्याही व्यक्तीच्या आवाजावरुन कळू शकेल की ती व्यक्ती भविष्यात मानसिक आजाराने ग्रस्त होणार किंवा नाही. अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंसद्वारे एक सिस्टीम तयार केले आहे. हे सिस्टीम भाषेत लपलेल्या सूचनांचा अभ्यास करतं, ज्याआधारे भविष्यात होणाऱ्या आजारांची माहिती दिली जाईल. ही सिस्टीम अमेरिकेच्या एमोरी विश्वविद्यालयाने विकसित केली आहे. 

एनपीजे सिजोफ्रेनिया पत्रिकेत प्रकाशित शोधानुसार, आर्टिफिशियल इंटेलिजेंसपासून बनलेल्या सिस्टीमध्ये दोन प्रकारच्या शब्दांचे विशेष विश्लेषण केले जाते. पहिला असा शब्द ज्याचा उच्चार आपण सर्वाधिक आणि मोठ्या आवाजात करतो आणि दुसरा असा शब्द जो आपण स्पष्टपणे उच्चारु शकत नाही. या आधारे भविष्यात होणाऱ्या मानसिक आजारांची 93 टक्के अचूक माहिती दिली जाऊ शकते.

एमोरी विश्वविद्यालयाचे शास्त्रज्ञ नेगुइन रेजाई यांचे म्हणणे आहे की, नवीन तंत्रज्ञान हे खूप संवेदनशील आणि अशा पॅटर्नचा शोध लावणारे आहे ज्याला आपण सहजरित्या बघू शकत नाही. हे एकप्रकारच्या मायक्रोस्कोपप्रमाणे आहे, जे आजारांबद्दल आधीच अलर्ट करतं. डोळ्यांमधील सुक्ष्म बॅक्टेरिया ओळखण्यासारखीच अवघड अशी ही भाषेतील मानसिक आजारांचा अंदाज देणाऱ्या शब्दांना ओळखण्याची ही पध्दत आहे. 

या शोधानुसार, मशीन भाषेशी निगडीत अशा मानसिक आजारांना ओळखू शकते. या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत सिजोफ्रेनिया (मानसिक आजार)ची लक्षणे साधारणपणे  ओळखता येतात. अशात 25 ते 30 टक्के प्रकरणांमध्ये काउंन्सिलींग च्या मदतीने आजाराच्या 80 टक्के वेळेपर्यंत ओळखल्या जाऊ शकते. पण नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने याहीपेक्षा लवकर मानसिक आजार लक्षात येऊ शकतो.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com