Auto Expo 2023: जबरदस्त! 'या' कारच्या केवळ बुकिंगसाठी द्यावे लागतील १० लाख, किंमत तब्बल... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Toyota Land Cruiser 300

Auto Expo 2023: जबरदस्त! 'या' कारच्या केवळ बुकिंगसाठी द्यावे लागतील १० लाख, किंमत तब्बल...

Toyota Land Cruiser 300 Details: Auto Expo 2023 मध्ये एकापेक्षा एक शानदार कार आणि बाईक्सला लाँच केले जात आहे. टोयोटाने या इव्हेंटमध्ये आपली सर्वात महागडी कार Toyota Land Cruiser 300 ला सादर केले आहे. या कारला ग्राहकांकडून नेहमीच पसंती मिळते. आता नवीन फीचर्ससह कारला सादर करण्यात आले आहे.

ग्राहकांच्या जबरदस्त मागणीमुळे एसयूव्हीचा बुकिंग पीरियड देखील जास्त आहे. Toyota Land Cruiser 300 साठी ४ वर्षांचा वेटिंग पीरियड आहे.

हेही वाचा: SBI: वारंवार बँकेत जाण्याची गरजच नाही, WhatsApp च्या एका क्लिकवर होतील तुमची सर्व कामं

Toyota Land Cruiser 300 ची किंमत

Toyota Land Cruiser 300 ला खरेदी करण्याची इच्छा असल्यास तुम्हाला केवळ बुकिंगसाठी १० लाख रुपये द्यावे लागतील. या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत जवळपास २ कोटी १७ लाख रुपये आहे. दरम्यान, या एसयूव्हीचे पुढील बुकिंग कधी सुरू होईल याविषयी कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही.

Toyota Land Cruiser 300 चे फीचर्स

Toyota Land Cruiser 300 एसयूव्हीमध्ये शानदार टेक्नोलॉजी, कॅबिनमध्ये कन्फर्टसह बरचं काही मिळते. कारमध्ये १२.३ इंच टचस्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टम देण्यात आली असून, जी अँड्राइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्लेला सपोर्ट करते.

कारमध्ये ४ झोन ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल, मूनरुफ, व्हेंटिलेटेड सीट्स, मल्टीपल यूएसबी चार्जिंग पोर्ट्स, वायरलेस चार्जिंग आणि १४ स्पीकर JBL प्रीमियम ऑडिओ सिस्टमसह अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत.

हेही वाचा: Smartphone Offer: OnePlus चा महागडा स्मार्टफोन मिळतोय स्वस्तात! फीचर्स खूपच भन्नाट; पाहा ऑफर

Toyota Land Cruiser 300 मध्ये मिळेल पॉवरफुल इंजिन

Toyota Land Cruiser 300 मध्ये ३.३ लीटर ट्विन-टर्बो डिझेल इंजिन देण्यात आले असून, जे १० स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. इंजिन ३०५ एचपी पॉवर आणि ७०० एनएम टॉर्क जरनेट करते.

हेही वाचा: गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

टॅग्स :carAutomobileAuto Expo