Auto Update : टायर फुटला तरी काळजी करू नका, आली 3 चाकांवर चालणारी कार, वाचा जबरदस्त फिचर

या कारची खास गोष्ट म्हणजे ही कार रस्त्यावर धावताना बाउंस होत धावणार असून ही केवळ तीन चाकांवर धावण्यासही सक्षम असेल
Auto Update
Auto Updateesakal

Auto Update : चिनची प्रमुख वाहन निर्माती कंपनी बिल्ड यूवर ड्रीम (BYD) ने शंघाई ऑटो शो मधे त्यांची नवी इलेक्ट्रिक सुपरकार यांगवांग यू- 9 (YangWang U9) लाँच केलीय. या कारच्या लाँचसह कंपनीने एका जबरदस्त टेक्नॉलीजीचं प्रदर्शनही केलंय. या कारची खास गोष्ट म्हणजे ही कार रस्त्यावर धावताना बाउंस होत धावणार असून ही केवळ तीन चाकांवर धावण्यासही सक्षम असेल. चला तर मग या कारबाबत सविस्तर जाणून घेऊया.

भाजपच्या माजी आमदार आणि कुरनूलच्या अलुरूच्या भाजप प्रभारी नीरजा रेड्डी यांचा काल रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. नीरजा रविवारी हैदराबादहून कर्नूलला येत असताना तेलंगणातील बीचुपल्ली येथे त्यांच्या कारचा टायर फुटला. अचानक टायर फुटल्याने कार पलटी झाली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. अशा अपघातापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी या नव्या कारमधे वापरण्यात आलेली टेक्नॉलॉजी वरदान ठरू शकते. जाणून घेऊया या कारची खासियत.

Auto Update
Auto Update

BYD ने जेव्हा यांगवांग यू- 9 इलेक्ट्रिक कारला स्टेजवर शो केलं तेव्हा ती बाउंस करत मीडियापुढे आली. तिची ही खासियत बघणाऱ्यांना कारकडे जास्त आकर्षित करत होती. मर्सिडीज बेंज जीएलईच्या एअर सस्पेंशनप्रमाणेच तुम्हाला यात हे हटके फिचर दिसून येईल. मात्र यांगवांग यू- 9 या इलेक्ट्रिक कारमधे वापरली गेलेली टेक्नॉलॉजी जास्त अॅडवांस असल्याचे म्हटले जातेय. एवढेच नव्हे तर ही कार केवळ तीन चाकांवर धावताना दिसली. कारच्या फ्रंट राइट साइडला तुम्हाला चाक नसतानाही कार फार आरामात चालत होती.

Auto Update
Electric Cars : इलेक्ट्रिक वाहने खरेदीच्या यादीत या देशांचा पहिला नंबर; टॉप १० मध्ये भारत आहे का?

काय आहे Disus-X टेक्नॉलॉजी ?

डिडस-एक्स सस्पेंशन सिस्टिममधे एक इंटेलिजंट डंपिंग बॉडी कंट्रोल सिस्टिम आहे. ज्यात एक इंटेलिजंट हायड्रोलिक बॉडी कंट्रोल सिस्टिम आणि इंटेलिजंट एअर बॉडी कंट्रोल सिस्टिम यांचा समावेश आहे. ही सिस्टिम सुपरकारला प्रत्येक बाजूने कंट्रोल देते. जरी कारचा फ्रंट व्हील खराब झाला किंवा फुटला तरी हे सस्पेंशन सिस्टिम कारला थोड्या पुढून वर उचलतं. ज्यामुळे ब्रेक रोटर्स जमिनिला स्पर्श करू शकत नाहीत. त्यामुळे ही कार विना अडथळे तीन चाकांवर आरामात चालू शकेल. (Automobile)

Auto Update
Old Vs New Car Purchase : पहिली कार? जुनी खरेदी करावी की नवीन? या गोष्टींची घ्या काळजी...

कंपनीच्या निर्मात्यांनी असेसुद्धा म्हटले आहे की, ही कार बॉडी रोलला कमी करते, त्यामुळे कार ब्रेकिंगसाठी याची खूप मदत होते. डिसस-एक्समधे ऑटोमेकरची इंटेलिजंस डंपिंग, हायड्रोलिक आणि एअर बॉडी कंट्रोल सिस्टिमचा वापर केला गेलाय.

या कारमधे क्वाड इलेक्ट्रिक मोटर सेटअपचा वापर केला गेलाय. कंपनीचा असा दावा आहे की ही कार फक्त दोन सेकंदात १०० किमी प्रती तासाच्या वेगाने धावण्यास सक्षम आहे. बिल्ड यूवर ड्रिमद्वारे जारी केलेल्या माहितीनुसार ही कार सिंगल चार्जमधे ७०० किमीपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com