Electric Cars : इलेक्ट्रिक वाहने खरेदीच्या यादीत या देशांचा पहिला नंबर; टॉप १० मध्ये भारत आहे का?

टॉप १० च्या यादीत भारताचा कितवा नंबर?
Electric Cars
Electric Cars esakal

Electric Cars : जगभरातले लोक आता पर्यावरणासाठी जागरूक झाले आहेत. त्यामुळेच इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. भारतात या गाड्यांच्या प्रती जागरूती व्हायला वेळ लागेल. पण, जगभरात मात्र लोकांनी या गाडीला आपलं वाहन बनवलं आहे.

नुकतेच सर्वात इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्या देशाची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये नॉर्वे देशाचा पहिला तर युनायटेड किंगडमचा शेवटचा नंबर लागतो.

भारतासह जगातील सर्वच देशांना प्रदूषण आणि महागडे पेट्रोल आणि डिझेल यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आणि यामुळेच हरित ऊर्जेला प्रोत्साहन दिल्याने जगातील बहुतांश देश इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. पुढे आम्ही तुम्हाला अशाच काही देशांची माहिती देणार आहोत.

Electric Cars
Electric Car: मस्कच्या Tesla चे धाबे दणाणार, Sony-Honda ने सादर केली भन्नाट फीचर्ससह येणारी कार
  • नॉर्वे - या यादीत नॉर्वेचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. या देशात विकल्या गेलेल्या 86 टक्के कार या इलेक्ट्रिक आहेत. चांगली गोष्ट म्हणजे या देशात इलेक्ट्रिक वाहने खरेदी केल्यास टॅक्स आणि रस्त्यावरील टोलमध्येही सूट देण्यात आली आहे.

  • आइसलँड - या यादीत दुसरे नाव आहे आइसलँड. या देशात विकल्या जाणाऱ्या कारमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा ७२ टक्के आहे.निसान लीफ इलेक्ट्रिक कार या देशात सर्वाधिक पसंतीची कार आहे.

  • स्वीडन - स्वीडनचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. या देशात विकल्या जाणाऱ्या 43 टक्के कार इलेक्ट्रिक आहेत. VW ID.4 ही देशातील सर्वाधिक पसंतीची इलेक्ट्रिक कार आहे.

  • डेन्मार्क - या यादीतील चौथे नाव डेन्मार्कचे आहे. या देशात विकल्या जाणाऱ्या 35 टक्के कार या इलेक्ट्रिक आहेत. टेस्लाची टेस्ला मोड एस ही या देशात सर्वाधिक पसंतीची इलेक्ट्रिक कार आहे

Electric Cars
Electric Car : तुमच्या इलेक्ट्रीक कारचा मायलेज (रेंज) वाढवायचाय?
  • फिनलंड - पाचवे नाव फिनलंडचे आहे. या देशात विकल्या जाणाऱ्या 31 टक्के कार इलेक्ट्रिक आहेत. या देशातील सर्वात जास्त पसंत केलेली इलेक्ट्रिक कार VW ID आहे.

  • नेदरलँड्स - या यादीतील पुढील देश नेदरलँड आहे. या देशात विकल्या जाणार्‍या 30 टक्के कार इलेक्ट्रिक कार आहेत.

  • जर्मनी - या यादीत जर्मनीही सातव्या क्रमांकावर आहे. या देशात विकल्या जाणाऱ्या ३० टक्के कार इलेक्ट्रिक आहेत. टेस्ला मॉडेल 3 या देशात खूप चालते.

  • स्वित्झर्लंड - आठवे नाव स्वित्झर्लंडचे आहे. या देशात विकल्या जाणार्‍या 22 टक्के कार इलेक्ट्रिक आहेत.

  •  पोर्तुगाल - या यादीत पुढचे नाव पोर्तुगालचे आहे. या देशात टेस्ला वाहनांनाही खूप पसंती दिली जाते आणि विकल्या जाणार्‍या 20 टक्के कार इलेक्ट्रिक आहेत.

  • युनायटेड किंगडम - या यादीतील शेवटचे आणि दहावे नाव युनायटेड किंगडमचे आहे. या देशात विकल्या जाणाऱ्या 19 टक्के कार इलेक्ट्रिक आहेत.

Electric Cars
Electric Car : ही असेल देशातली सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रिक SUV, टाटा नेक्सॉन EV ला ही टाकेल मागे

भारताची काय परिस्थिती

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी ही प्रचंड वाढली आहे. पुढील 10 वर्षात भारतीय रस्त्यांवर पेट्रोल आणि डिझेल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहने अधिक दिसली तर नवल वाटायला नको. गेल्या चार वर्षात भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत मोठी वाढ झाली आहे.

2020 ते 15 मार्च 2023 पर्यंत भारतात 2,56,980 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी  झाली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या ई-वाहन पोर्टलनुसार देशात नोंदणीकृत इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येच्या तपशीलाबद्दल केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी संसद भनवातदिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com