esakal | Battleground Mobile India अ‍ॅपमध्ये Error येतोय? या सोप्या टिप्सने करा दूर
sakal

बोलून बातमी शोधा

Battleground Mobile India

BGMI अ‍ॅपमध्ये Error येतोय? या सोप्या टिप्सने करा दूर

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

Battleground Mobile India Error : बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया एरर बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया (BGMI) जवळजवळ एक महिना बीटामध्ये राहिल्यानंतरच गेल्या महिन्यात गूगल प्ले स्टोअरवर अँड्रॉइडसाठी रिलीझ करण्यात आले. PUBG मोबाइल इंडियन व्हर्जन iOS वापरकर्त्यांसाठी लवकरच रिलीज होणार आहे, पण iOS लाँच होण्याची तारीख ठरलेली नाही. बॅटल रॉयल गेमची स्टेबल व्हर्जन लॉंच केले हेले आहे, मात्र गेम खेळत असताना गेमर्सना अजूनही काही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सध्या गेमर्सना सगळ्यात मोठी अडचण येत आहे ती म्हणजे “server is busy, please try again later. Error code: restrict area”. गेम बीटामध्ये असताना सर्व्हर busy समस्या बर्‍यापैकी येत होती, परंतु काही वापरकर्त्यांना स्टेबल व्हर्जनमध्ये देखील समस्या येत आहे. एरर मेसेजमुळे गेमर्सला गेम सुरु करताना अडचण येते. हा एरर येण्यामागील कारण काय आहे आणि कसा घालवू शकता याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

भारताबाहेरून गेम एक्सेस

आपण भारताबाहेरुन BGMI गेम मध्ये एक्सेस करण्याचा प्रयत्न करीत असल्यास आपणास server is busy हा एरर येऊ शकतो. बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया गेम, नावाप्रमाणेच अधिकृतपणे केवळ भारतात उपलब्ध आहे. म्हणूनच, जो कोणी वेगळ्या देशातून गेम एक्सेस करण्याचा प्रयत्न करीत असेल त्याला वारंवार server busy समस्यांचा सामना करावा लागतो.

इंटरनेट

बीजीएमआय वर सर्व्हर बिझी एरर येण्या मागील सर्वात सामान्य कारण म्हणजे कमकुवत इंटरनेट हे आहे. गेममध्ये प्रवेश करण्यासाठी खेळाडूंकडे स्टेबल वाय-फाय कनेक्शन असणे आवश्यक आहे. ते जर का नसेल तर ही समस्या येणे सुरूच राहील. जर आपणास BGMI वर समस्या येत असेल तर पहिल्यांदा आपले इंटरनेट कनेक्शन तपासून पहा.

हेही वाचा: Airtel चा कुटुंबासाठी बेस्ट प्लॅन, 260 GB डेटा अन् बरंच काही

गेमचे साइड लोडेड वर्जन (Sideloaded Version)

server is busy समस्या बीजीएमआय वर का उद्भवते याचे मुख्य कारण गेमचे साइड लोडेड वर्जन असू शकते. आपणास समस्या येत असल्यास, आपल्या फोनवरून अॅप अनइंस्टॉल करा आणि Google Play स्टोअर वरून बीजीएमआय गेम पुन्हा इंस्टॉल करा. तुम्ही जर थर्ड पार्टी अ‍ॅप स्टोअर किंवा APK आणि OBB फायलींमधून गेम डाउनलोड केल्यास ही समस्या पुन्हा पुन्हा उद्भवू शकते.

अनसपोर्टेड डिव्हाइस (unsupported Device)

आपण अनसपोर्टेड डिव्हाइसवर गेम चालवित असल्यास हे एक server is busy हा एरर दाखवण्याचे आणखी एक कारण हे आहे. बीजीएमआय गेम केवळ गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे आणि Android वापरकर्त्यांद्वारे डाउनलोड आणि प्ले केला जाऊ शकतो. म्हणून, आपण इम्युलेटर किंवा अनसपोर्टेड डिव्हाइस वापरत असल्यास, server is busy हा एरर दाखवला जाईल. याल उपाय हा फक्त सपोर्टेड डिव्हाइस वापरणे हा आहे.

हेही वाचा: Redmi चा पहिला 5G स्मार्टफोन भारतात लॉंच; जाणून घ्या किंमत

loading image
go to top