Dating App चे मायाजाळ! महिलांची नव्हे तर, पुरुषांची होतेय फसवणूक

Dating App चे मायाजाळ! महिलांची नव्हे तर, पुरुषांची होतेय फसवणूक
Updated on

नेटफ्लिक्सवर २ फेब्रुवारीला The Tinder Swindler नावाची एक डॉक्यूमेंट्री प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये Conman शिमोन हएत (Shimon Hayut) याच्या आयुष्यावर आधारित ही कथा असून त्यात त्याच्या पात्राचे नाव सायमन लिवाय असे आहे. सायमन फ्रान्समध्ये (France) राहत असून एका कित्येकवेळा फसवणूकीच्या (Fraud) प्रकरणांमध्ये सहभागी असतो. फ्रान्स पोलिसांना चकवा देऊन हा इस्राईलला (Israel) पळून जातो. तेथे Tinder हे डेटिंग अ‍ॅप (Dating App) वापरून तो मुलींसोबत मैत्री करत असे आणि त्यांना खोट्या गोष्टी सांगून त्यांच्याकडून पैसे उकळत असे. Tinder वर मैत्री करून तो जवळपास ७५ करोड रुपयांची फसवणूक करतो. (Be Aware while using Bumble, Tinder type Dating App, Learn How To Stay Safe )

साइमन सारख्या Tinder Swindler पासून राहा सावध! (Beware of Tinder Swindler like Simon)

डॉक्यूमेंट्री प्रसिद्ध ल्यानंतर Tinder ने साईमनला आपल्या प्लॅटफॉर्मवरून बॅन केले आहे. Tinder च्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ''या नावाने किंवा इतर कोणत्याही नावाने कोणतीही फ्रॉड व्यक्ती त्यांच्या प्लॅटफॉर्मवर नाही. पण डिजिटल फसवणूकीच्या काळात असे वारंवार होऊ शकतो. ही डॉक्यूमेंट्री नक्की पाहिली पाहिजे. त्यामुळे साईमनची पूर्ण गोष्ट काय आहे? त्यांचे फसवणूक करण्याची पध्दत काय आहे? तुम्हाला समजले. जेणेकरून डेटिंग अ‍ॅपवर असलेल्या सायमन सारख्या फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा.

Dating App चे मायाजाळ! महिलांची नव्हे तर, पुरुषांची होतेय फसवणूक
काळजी घ्या! Kiss घेतल्यानं होऊ शकतात आजार

फक्त महिलाच नव्हे पुरुषही ठरतायेत डेटिंग अ‍ॅपचे बळी (Not only women, Men are also the victims of the Dating app)

डेटिंग अ‍ॅप द्वारे फक्त महिलांची फसवणूक होतेय असे नाही तर, पुरुषांची ही फसवणूक होत असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत.

पहिली घटना :

महाराष्ट्रातील ठाणे येथे एका ३६ वर्षीय व्यक्तीला एका महिलेने कैद करून ठेवले होते. हळू हळू त्याच्याकडून ६ लाख रूपये वसूल केले. पिडीत व्यक्ती या महिलेला डेटिंग अ‍ॅप मार्फत भेटला होता. महिलेने त्याला आपल्या शहरामध्ये बोलावले आणि इतर आरोपींच्या मदतीने त्याला कैद केले होते. महिलाने त्याला सोडण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली होती

दुसरी घटना:

गुरग्राम येथे २७ वर्षीय बिझनेसमनने जसे डेटिंग अ‍ॅप सुरू केले तसे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी फी वसूल करण्याच्या नावाखाली वेगवेगळ्या बॅक अकाऊंटमधून ६५ लाख वसूल केले. अकाऊंट सुरु केल्यानंतर कंपनीच्या महिला कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी संपर्क साधला. बिझनेसमनला जेव्हा शंका आली तेव्हा, त्याने पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा महिलेने बलात्काराचा आरोप लावण्याची धमकी दिली.

Bumble, Tinder, TrulyMadly, OkCupid आणि Grindr अशा कित्येक डेटिंग अ‍ॅपचा वापर आजकालची तरुण पिढी करत आहे. असे अ‍ॅप कित्येक वेळा तुम्हाला संकटामध्ये टाकू शकतात. तुम्ही ऑनलाईन फसवणूकीच्या जाळ्यात अडकू शकता. जर तुम्ही सिंगल असाल तर तुम्ही अशा कोणत्याही डेटिंग अ‍ॅपवरून मैत्री करण्याचा विचार करत असाल तर सावध राहा.

Dating App चे मायाजाळ! महिलांची नव्हे तर, पुरुषांची होतेय फसवणूक
Kiss Day : किस करताय? 'शास्त्र असतं ते!'

डेटिंग अ‍ॅप वापरताना काय काळजी घ्यावी? (How to take Care when using a dating app?)

ऑनलाईन डेटिंगमुळे होणाऱ्या फसवणूकीच्या कित्येक घटना महत्त्वाच्या आहेत. फसवणूक करणारे समोरच्या व्यक्तीच्या दुर्बलतेचा किंवा परिस्थितीचा फायदा घेतात. अ‍ॅप द्वारे खोटे प्रेम, रोमान्स दाखवून रिलेशनशीपमध्ये येतात. जेव्हा एखाद्याला वाटते की, समोरच्या व्यक्ती खोट्या प्रेमात अडकवत आहे, तेव्हा त्याला पैशांची मागणी केली जाते.

कोविड १९ काळात डेटिंग अ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशामध्ये ऑनलाईन डेट करताना सावध राहण्याची आवश्यकता आहे. ऑनलाईन मैत्री केल्यानंतर कोणी पैसे मागत असेल तर पैसे देण्याआधी विचार करा. तरीही तुमच्यासोबत फसवणूक झाल्यास न घाबरता तक्रार दाखल करा.

डेटिंग अ‍ॅप्स किती सुरक्षित आहे? (How secure are Dating apps?)

कोणत्याही अ‍ॅपवरून मैत्री करू नका, सर्व अ‍ॅपची एकमेकांसोबत तुलना करा. सुरक्षेच्या दृष्टीने कोणते अ‍ॅप सुरक्षितता, गोपनियता देत आहे या आधारावर डेटिंग अ‍ॅपची निवड करा.

सेफ्टी गाईडलाईन (Safety guideline)

नवीन प्रोफाईल बनविण्यासाठी प्रत्येक अ‍ॅपची प्रक्रिया वेगळी असते. सहसा साईन-अप करण्यासाठी एक मोबाईल नंबर, इमेल आयडी, नाव, वय आणि ठिकाण या माहितीची गरज असते. जास्त सेफ्टी गाईडलाईन देणाऱ्या अ‍ॅप वापरताना यूजरला थोडे जास्त प्रश्नांची उत्तर द्यावी लागू शकता. पण या सेफ्टी गाईडलाईन फॉलो करा. घाई करू नका.

ब्लॉक करणे किंवा तक्रार दाखल करण्याची सुविधा (Blocking or Reporting facility)

पैस खर्च करून नोदणी करावी लागणारे अ‍ॅप प्राईव्हसीची सुविधा देतात. उदा. टिंडरवर जर तुम्ही लोकेशन सांगू इच्छित नसाल तर तुम्ही टिंडर प्लसचा वापर करू शकता. त्यासाठी तुम्हाला थोडे जास्त पैस खर्च करावे लागतील. अशा प्रकारे टिंडर आणि ट्रली Trolley.) सारख्या अ‍ॅपवर तुम्हाला गप्पा मारण्यास सुरूवात केल्यानंतर तुम्हाला अनमॅच करण्याचा पर्याय देखील मिळतो

Dating App चे मायाजाळ! महिलांची नव्हे तर, पुरुषांची होतेय फसवणूक
Valentine Day: 'व्हॅलेंटाईन' वीक लिस्ट, प्रेम व्यक्त करण्याच्या जाणून घ्या ट्रिक्स

डेटिंग अ‍ॅपवर अकाऊंट सुरू करण्याआधी काय करावे? (What to do before starting an account on a dating app?)

सावध राहा

प्रोफाईल बनविताना थोडी काळजी घ्या, जेणेकरून नंतर तुम्हाला आपल्याबाबत दिलेली कोणतीही माहिती डिलीट करावी लागणार नाही. कधीही सुरुवातीपासून आपल्याबाबत जास्त माहिती देऊ नका. अशा अ‍ॅपसाठी वेगळा नंबर वापरा, जेणेकरून गरज पडेल तर तुम्ही फोन नंबर स्विच ऑफ किंवा बंद करू शकता.

वैयक्तिक माहिती देऊ नका (Don't Provide personal information)

आपली वैयक्तिक माहिती देऊ नका. अडनाव, टोपन नाव सोशल मिडियावरील हॅन्डल, आपली इमेल आयडी, फोन नंबर, ऑनलाईन डेटिंग प्रोफाईन समाविष्ठ करू नका. डेटिंग अ‍ॅपवर नोंदणी करण्यासाठी तुम्हाला आपल्या फेसबूकवरून लॉग ईन करणे टाळा.

अ‍ॅप डाऊनलोड करण्याआधी तपासणी करा (Camper With Other app before downloading)

ज्या अ‍ॅपचा वापर करण्याचा तुम्ही विचार करत आहात, त्याबाबत कोणतीही तक्रार नोंदविलेली आहे का ?याची तपासणी करा. स्थानिक पातळीवर तयार झालेले अ‍ॅप डाऊनलोड करू नका. मोबाईल मेसेजवर कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करण्याचा सल्ला दिला जात असेल तर ते डिलिट करा.

फेसबुक आणि इंस्टाग्रामचा फोटो वापरू नका (Don't Use Facebook and Instagram photos)

सोशल मिडियावर वापरलेला फोटो डेटिंग अ‍ॅपचा प्रोफाईन म्हणून वापरू नका. असे केल्याने समोरच्या व्यक्तीला सर्व माहिती फोटो शोधून मिळू शकते. तुम्ही कोण आहात, कुठून आहात सर्व माहिती मिळू शकते. फसवणूक करणारा व्यक्ती खाजगी माहितीचा फायदा घेऊ शकतो. डेटिंग अ‍ॅपवर उपलब्ध असलेला प्रत्येक व्यक्ती वाईट नसतो. पूर्णपणे तपासणी केल्यावरच मैत्री करा. तरीही काही गोष्टींची काळजी घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com