हेल्थ ट्रॅक करण्यासाठी घ्या 'हे' फिटनेस बँड

आपल्या स्मार्ट होण्याच्या प्रक्रियेमध्ये बाजारातील काही फॅशन ट्रेंडदेखील आपली मदत करत असतात.
हेल्थ ट्रॅक करण्यासाठी घ्या 'हे' फिटनेस बँड

बदलत्या काळात स्वत:ला टिकवून ठेवायचं असेल तर स्मार्ट (smart) होणं गरजेचं आहे. त्यामुळे केवळ व्यक्तिमत्त्व विकासच नव्हे तर आपला सर्वांगाने विकास होणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे आपल्या स्मार्ट होण्याच्या या प्रक्रियेमध्ये बाजारातील काही फॅशन ट्रेंडदेखील आपली मदत करत असतात. थोडक्यात सांगायचं झालं तर आपली पर्सनालिटी उठावदार दिसण्यासाठी अनेक नवीन गॅझेट बाजारात सहज उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतं. आजकाल प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि फिटनेस बँड सारखे अनेक नवीन तंत्रज्ञान असलेले गॅझेट पाहायला मिळतात. त्यातच सध्या फिटनेस बँड तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय होताना दिसत आहे. केवळ फॅशन म्हणून नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचं म्हणून हे फिटनेस बँड (fitness band) खरेदी करण्याकडे अनेकांचा कल आहे. (best-fitness-band-and-smart-watch-tracker-in-india-2021)

आज बाजारात हजार रुपयांपासून ५० हजारांपर्यंत अनेक फिटनेस बँड सहज उपलब्ध आहेत. या फिटनेस बँडमध्ये ऑक्सिजन लेव्हलपासून ट्रॅकिंगपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. म्हणूनच, सध्याच्या काळात विशेष लोकप्रिय ठऱत असलेले व कमी किंमतीचे फिटनेस बँड कोणते ते पाहुयात.

हेल्थ ट्रॅक करण्यासाठी घ्या 'हे' फिटनेस बँड
चिंता नको! तिसरी लाट लहान मुलांना ठरणार नाही घातक

१. Mi Smart Band 5 -

शाओमी या कंपनीचा Mi Smart Band 5 हे फिटनेस बँड सध्या सर्वाधिक चर्चिलं जात आहे. १.१ इंचाचा AMOLED display असलेल्या या बँडमध्ये ११ वर्कआऊट मोड्स देण्यात आले आहेत. Personal Activity Intelligence (PAI) सोबत येणाऱ्या या बँडमध्ये २४ तास स्लिप ट्रॅकिंग असून या फिटनेस बँडची किंमत २,५०० पर्यंत आहे.

२. Oppo Band -

ओपो ही कंपनी कायमच त्यांच्या नव्या फिचर्समुळे चर्चेत असते. यावेळीदेखील ओपो त्यांच्या फिटनेस बँडमुळे चर्चेत आहे. Oppo Band मध्ये १२ बिल्ट-इन वर्कआउट मोड्स देण्यात आले असून त्यात योगाचा देखील समावेश करण्यात आला आहे. या फिटनेस बँडची किंमत ३ हजार ९९९ रुपये असून ऑनलाइन माध्यमातून तुम्ही सहज ऑर्डर करु शकता.

हेल्थ ट्रॅक करण्यासाठी घ्या 'हे' फिटनेस बँड
वैवाहिक आयुष्यात रोज वाद होतात?
हेल्थ ट्रॅक करण्यासाठी घ्या 'हे' फिटनेस बँड
प्रेम की मैत्री? दोघांमधील अंतर कसं ओळखाल

३. ​French Connection R7 -

French Connection R7 हे स्मार्टवॉच असून यामध्ये तुम्ही रक्तदाब, हृदयाची गती चेक करु शकता. यात ११ वेगवेगळ्या स्पोर्ट्स मोड्स देण्यात आले आहेत. याची किंमत ५ हजार ४९९ रुपयांच्या आसपास आहे.

४. Noise Colorfit Pro 2 smartwatch -

Noise या कंपनीचे Colorfit Pro 2 smartwatch या स्मार्टवॉचची सध्या अनेकांना भूरळ पडत आहे. या स्मार्टवॉचमध्ये बिल्ट-इन अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर देण्यात आले आहे. तसंच त्यात ब्रिथ फिचर्सदेखील आहेत. ९ वेगवेगळे स्पोर्ट्स मोड असलेल्या या स्मार्टवॉचची किंमत २ हजार ५९९ इतकी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com