esakal | 500 रुपयांच्या आतील सर्वोत्तम प्रीपेड प्लॅन, वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

MOBILE RECHRAGE

एअरटेल, जियो, वोडाफोन आयडिया (VI) आणि बीएसएनएल अशा कंपन्यांजवळ अनेक अनलिमिटेड डेटा आणि वॉईस बेनिफिट्सचे प्लॅन्स आहेत

500 रुपयांच्या आतील सर्वोत्तम प्रीपेड प्लॅन, वाचा...

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: एअरटेल, जियो, वोडाफोन आयडिया (VI) आणि बीएसएनएल अशा कंपन्यांजवळ अनेक अनलिमिटेड डेटा आणि वॉईस बेनिफिट्सचे प्लॅन्स आहेत. ग्राहकांना आपल्या गरजेनुसार  प्लॅन निवडणे मात्र मुश्कील झाले आहे. आज तुमची ही अडचण सोडवून 500 रूपयांपेक्षा कमी आणि उत्तम अनलिमिटेड बेनिफिटच्या प्रीपेड प्लॅन्सबाबत या लेखात जाणून घेणार आहोत.   

247 रूपयांचा बीएसएनएल 'एसटीव्ही' प्लॅन- 
500 रूपयांपेक्षा कमी पैशांत येणारा एसटीव्ही 247 हा प्लॅन बीएसएनएलच्य बेस्ट अनलिमिटेड प्रीपेड प्लॅनमध्ये समाविष्ट आहे. या प्लॅनमध्ये 3 GB(FUP) डेटा मिळणार आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग( प्रतिदिवस 250 मिनिटे) आणि 100 एसएमएसही या प्लॅनमध्ये समाविष्ट आहेत. FUP डेटा संपल्यावर स्पीड कमी होऊन 80 केबीपीए इतका होतो. याशिवाय वापरकर्त्यांना इरोस नाऊ आणि बीएसएनएल ट्यून्सचेही मोफत सबस्क्रीप्शन मिळते. हा पॅक 40 दिवसांपर्यंत चालतो.

खुशखबर! PUBGचं भारतात 'कमिंग सून', सोशल मीडियावर टिझर लाँच

449 रूपयांचा एअरटेल प्लॅन-
बीएसएनएलनंतर एअरटेलचा 449 रूपयांच्या प्लॅनचा क्रमांक लागतो. यात रोज 2 GB हायस्पीड डेटा ऑफर केला जातो. याशिवाय देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंग फ्री आहे. ग्राहक रोज 100 एसएमएसही पाठवू शकतात. हा पॅक 56 दिवसांच्या काळात वापरता येऊ शकतो. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये एअरटेल एक्ट्रीम प्रीमियम आणि एक वर्षापर्यंत शॉ अकादमी, विंक म्यूझिक आदींचे सबस्क्रीप्शन मोफत देण्यात येते.  

OnePlus ते Samsung चे 12GB रॅम असलेले सर्वोत्तम स्मार्टफोन

 444 रूपयांचा जियो प्रीपेड प्लॅन- 
जियोच्या 444 रूपयांचा उत्तम अनलिमिटेड प्रीपेड प्लॅन 56 दिवसांपर्यंत वापरता येतो. या प्लॅनमध्ये प्रत्येक दिवशी 2 GB डेटा देण्यात येतो. प्रत्येक दिवशी मिळणारा डेटा संपल्यावर 64 एमबीपीएस स्पीडनुसार डेटा वापरता येतो.  यातही तुम्ही 100 एसएमएस मोफत मिळवू शकतात. जियो अॅप्सचे सबस्क्रीप्शनही तुम्ही या रिचार्जमध्ये वापरू शकता. 

449 रूपयांचा व्हीआय प्लॅन- 
449 रूपयांचा व्हीआय अनलिमिटेड प्रीपेड प्लॅन मध्ये डबल डेटाची ऑफर देण्यात येते. म्हणजे ग्राहक प्रत्येक दिवशी 4GB डेटा उपभोगू शकता.  या प्लॅनमध्ये कॉलिंग फ्री असून प्रत्येक दिवशी 100 एसएमएससुद्धा मिळतात. वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये 'वीकेंड डेटा रोलओव्हर'ची सुविधाही देण्यात येते.

(edited by- pramod sarawale)