esakal | खुशखबर! PUBGचं भारतात 'कमिंग सून', सोशल मीडियावर टिझर लाँच
sakal

बोलून बातमी शोधा

pubj coming soon in india

2020ची दिवाळी PUBG Mobile प्रेमींसाठी मोठी आनंदाची गेली असणार, कारण दिवाळीच्या दोन दिवस आधी पबजी कॉर्पोरेशनने ही गेम लवकर भारतात परतणार असल्याची घोषणा केली होती.

खुशखबर! PUBGचं भारतात 'कमिंग सून', सोशल मीडियावर टिझर लाँच

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: 2020ची दिवाळी PUBG Mobile प्रेमींसाठी मोठी आनंदाची गेली असणार, कारण दिवाळीच्या दोन दिवस आधी पबजी कॉर्पोरेशनने ही गेम लवकर भारतात परतणार असल्याची घोषणा केली होती. यावेळी ती गेम 'PUBG Mobile India' नावाने लाँच करण्यात येणार आहे. आता देशातील पबजीचे चाहते या नव्या गेमची आतुरतेने वाट पाहत आहेत. PUBG Mobile India च्या लाँच होण्याच्या घोषणेनंतर त्याचे अपडेट्स वेबसाईटवर येत आहेत. 

PUBG Mobile India ची नवीन वेबसाईट लाँच-
पबजी कॉर्पोरेशनने PUBG Mobile Indiaची (PUBG Mobile India Website) नवीन वेबसाइट सुरू केली आहे. यामध्ये 'कमिंग सून'ची टॅगलाइनही देण्यात आली आहे. तसेच या वेबसाइटवर पबजी मोबाइल इंडियाच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजेस आणि यूट्यूब चॅनल्सच्या लिंक्सही दिल्या आहेत.

OnePlus ते Samsung चे 12GB रॅम असलेले सर्वोत्तम स्मार्टफोन

पहिला टीझर रिलीज-PUBG Mobile India first teaser: 
पबजी कॉर्पोरेशनने पबजी मोबाइल इंडियाचा पहिला टीझरही रिलीज केला आहे. हा टीझर पबजी मोबाइल इंडियाच्या सोशल मीडिया चॅनल्सवर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये फेसबूक तसेच इंस्टाग्रामचा समावेश आहे. या टीझरमध्ये प्रसिद्ध PUBG Mobile प्लेअर जोनाथन, क्रोनटेन आणि डायनमो दाखवण्यात आले आहे.

कधी होणार PUBG Mobile India लाँच-
पबजी कॉर्पोरेशनने पबजी मोबाइल इंडियाच्या रिलीजची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. पण 'कमिंग सून'चा संदेश वेबसाइटवर देण्यात आला आहे. पहिला टीझरही आला आहे. यामूळे PUBG Mobile India भारतात लवकरच येईल अशी चिन्हे दिसत आहेत.

Corona Impact - मोबाइल डेटाच्या वापरात शहरी लोकांपेक्षा 'गावकरी' ठरले भारी

पबजी मोबाइल इंडियाने यावर काय सांगितले-
पबजी कॉर्पोरेशनने 12 नोव्हेंबरला सांगितले होते की, पबजी भारतात नवीन गेम आणण्याच्या तयारीत आहे. याला PUBG Mobile India नावाने लाँच करण्यात येणार आहे. ही गेम भारतीयांसाठी खास डिझाईन केलेली आहे.

(edited by- pramod sarawale)