Prepaid Plans : 28 दिवसांचे बेस्ट प्लॅन्स; दररोज 3GB पर्यंत डेटा, फ्री कॉल अन् बरंच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

best prepaid plans jio airtel and vi with 28 days validity with upto 3gb data and many benefits check list

28 दिवसांचे बेस्ट प्लॅन्स; दररोज 3GB पर्यंत डेटा, फ्री कॉल अन् बरंच

टेलिकॉम ऑपरेटर्सकडून ऑफर केलेल्या अनेक प्रकारच्या प्रीपेड प्लॅन्सपैकी एक सर्वात कमी किंमतेचे पॅक जे कमी वैधतेसह येतात त्यांना मोठी मागणी असते. हे पॅक स्वस्त असतात ज्यामुळे तुमच्या खिशावर जास्त ताण पडत नाही. हे शॉर्ट व्हॅलिडिटी प्लॅन, विशेषत: 28 दिवसांचे प्लॅन हे कंपन्यांकडून ऑफर केलेल्या बेस्टसेलर प्लॅनपैकी एक आहेत. आज आपण एकाच ठिकाणी Jio, Airtel आणि Vi च्या अशा प्लॅनची ​​यादी पाहाणार आहोत ज्यांची वैधता 28 दिवस आहे.

रिलायन्स जिओ

- जिओ 28 दिवसांच्या वैधतेसह काही प्लॅन ऑफर करते. त्याचा सर्वात सामान्य प्लॅन हा 299 रुपयांचा आहे, जो 28 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा ऑफर करतो. या प्लॅनसह, वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉइस कॉल आणि दररोज 100 एसएमएस देखील मिळतात.

- थोड्या कमी डेटा चालणार असेल अशा वापरकर्त्यांसाठी, 239 रुपयांचा प्लॅन एक चांगला पर्याय असू शकतो. हे 28 दिवसांसाठी 1.5GB डेटा, अमर्यादित कॉल आणि 100 SMS प्रतिदिन ऑफर करतो. दुसरीकडे, दररोज 1GB डेटा ऑफर करणार्‍या प्लॅनची ​​किंमत 209 रुपये आहे, जो 28 दिवसांची वैधता, अमर्यादित कॉल आणि दररोज 100 SMS देखील देतो.

- अधिक डेटा हवा असलेल्या वापरकर्त्यांसाठी, Jio चा 601 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांसाठी 3GB डेटा आणि अतिरिक्त 6GB डेटा ऑफर करतो. या प्लॅनमध्ये डिस्ने+ हॉटस्टार सदस्यता देखील मिळते.

टीप- वर नमूद केलेल्या सर्व जिओ प्लॅन जिओ अॅप्सच्या सबस्क्रिप्शनसह येतात.

हेही वाचा: स्वस्तात दमदार 5G स्मार्टफोन; किंमत तुमच्या बजेटमध्ये, येथे पाहा यादी

Vodafone Idea (Vi)

- Vi वापरकर्त्यांना 28 दिवसांच्या वैधतेसाठी 269 रुपये, 299 रुपये, 359 रुपये, 409 आणि रुपये 475 मध्ये दररोज 1GB, 1.5GB, 2GB, 2.5GB आणि 3GB डेटा ऑफर करते. हे सर्व प्लॅन अमर्यादित व्हॉईस कॉल्स आणि दररोज 100 एसएमएससह येतात. Vi अतिरिक्त 3GB डेली प्लॅन देखील ऑफर करते जो Disney+ Hotstar च्या वार्षिक सबस्क्रिप्शनसह येतो आणि वरील प्रमाणेच फायद्यांसह 501 रुपयांत येतो.

याव्यतिरिक्त, या प्लॅन्सवरील अतिरिक्त फायद्यांमध्ये "बिंज ऑल नाईट" फीचर समाविष्ट आहे जे वापरकर्त्यांना रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत अमर्यादित इंटरनेट वापरण्याची परवानगी देते. वापरकर्ते सोमवार ते शुक्रवार त्यांचा न वापरलेला डेटा देखील ते शनिवार आणि रविवार या कालावधीत वापरु शकतात ज्याला "वीकेंड रोलओव्हर" बेनिफीट असे म्हणतात. याशिवाय यूजर्सना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय दर महिन्याला 2GB डेटा बॅकअप मिळतो.

हेही वाचा: बेलारुसमध्ये रशियन सैनिकांच्या प्रेतांचा खच; कुजल्याने येतेय दुर्गंधी

एअरटेल - एअरटेल देखील समान डेटा बेनिफिट्ससह काही प्लॅन ऑफर करते. वापरकर्ते 265 रुपये, 299 रुपये, 359 रुपये आणि 599 रुपये मध्ये 28 दिवसांसाठी 1GB, 1.5GB, 2GB आणि 3GB डेटा दररोज मिळवू शकतात. हे सर्व प्लॅन Amazon Prime Video च्या मोबाइल व्हर्जनचे सबस्क्रिप्शन देतात आणि 599 रुपयांच्या प्लानमध्ये Disney+ Hotstar ऍक्सेस देखील दिला जातो. या प्लॅन्समध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉईस कॉल तसेच दररोज 100 एसएमएस मिळतात. - एअरटेल 449 रुपयांचा प्लॅन देखील ऑफर करते जो 28 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि वरीलप्रमाणेच फायदे देतो परंतु दररोज 2.5GB डेटा ऑफर करतो. तसेच, परवडणाऱ्या प्लॅनच्या शोधात असलेल्या वापरकर्त्यांसाठी, Airtel चा 179 रुपयांचा प्लॅन ऑफर करते ज्यामध्ये 28 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉईस कॉल आणि 300 SMS सह एकूण 2GB डेटा येतो.

हेही वाचा: राणे बंधूंविरोधात FIR; नारायण राणे म्हणाले, "टीकेचे खंडन करणे हे.."

Web Title: Best Prepaid Plans Jio Airtel And Vi With 28 Days Validity With Upto 3gb Data And Many Benefits Check List

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :TechnologyPrepaid Plan