2020 मधील बेस्ट मोबाईल; 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असलेले स्मार्टफोन

टीम ई सकाळ
Wednesday, 16 December 2020

सध्या युजर्सना स्मार्टफोन घेण्यासाठी हजारो पर्याय उपलब्ध आहेत. मात्र यात सर्वाधिक मागणी असते ती बजेट फोनची. यातही दहा हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील मोबाईल फोनची मागणी जास्त असते.

नवी दिल्ली - Look back 2020 मोबाईलच्या तंत्रज्ञानात दररोज नव्याने भर पडत आहे. सध्या युजर्सना स्मार्टफोन घेण्यासाठी हजारो पर्याय उपलब्ध आहेत. मात्र यात सर्वाधिक मागणी असते ती बजेट फोनची. यातही दहा हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील मोबाईल फोनची मागणी जास्त असते. 2020 मधील अशाच काही बेस्ट फोन्सची यादी आपण पाहूया. 

Xiaomi Redmi 9 Prime
रेडमी 9 प्राइम स्मार्टफोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत क्वाड रिअर कॅमेरा सेटअप आणि 6.53 इंचाचा डिस्प्ले आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलिओ जी80 प्रोसेसर, 4 जीबी रॅम आहे. तसंच 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आणि 5020 mAh बॅटरी असून फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. फोनमध्ये 64 जीबी इनबिल्ट स्टोरेजही आहे. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजच्या व्हेरिअंटची किंमत 9 हजार 999 रुपये इतकी आहे. 

Realme Narzo 20A: 
रिअलमी नार्झो 20 ए मध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर आणि 3 जीबी रॅम आहे. यामध्ये 12 मेगापिक्सन प्रायमरी कॅमेऱ्यासह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. यात 5 हजार mAh बॅटरी देण्यात आली आहे. रिअलमीच्या फोनमध्ये 4 जी एलटीई, वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ 5.0 आणि मायक्रो युएसबी पोर्ट आहे. 

हे वाचा - Year 2020 Google Search : कोरोना काळात लोकांनी काय केलं सर्वाधिक सर्च

Vivo U10
विवो यु 10 मध्ये 6.35 इंचाची स्क्रीन असून 3 जीबी रॅम आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 5 हजार mAh बॅटरी असून 3 जीबी रॅमचा पर्याय आहे. हँडसेटमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर आहे. फोनच्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 9 हजार 990 रुपये आहे.

Oppo A12
ओप्पो ए12 च्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 8 हजार 990 रुपयांमध्ये घेता येईल. या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी35 प्रोसेसर, 6.22 इंचाचा डिस्प्ले आणि 13 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा असून 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरासुद्धा आहे. फोनमध्ये 4230 mAh बॅटरी देण्यात आली आहे. 

हे वाचा - गुगलवर तयार करा व्हर्च्युअल कार्ड, नाव सर्च करताच मिळेल तुमची माहिती

Nokia C3
नोकिया सी 3 भारतात 2 जीबी रॅम, 16 जीबी स्टोरेज आणि 3 जीबी रॅम 32 जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. यांची किंमत अनुक्रमे 7999 आणि 8999 रुपये इतकी आहे. फोनमध्ये 5.99 इंचाचा डिस्प्ले असून अँड्रॉइड ओएसवर चालतो. यामध्ये ऑक्टा कोअर युनिसॉक SC9863A प्रोसेसर आहे. 8 मेगापिक्सल सिंगल रिअर आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. नोकिया सी3 स्मार्टफोनमध्ये 4.2 ब्लूटूथ, जीपीएस, 3.5 एमएम ऑडिओ जॅक आणि मायक्रो युएसबी पोर्टसारखी फीचर्स आहेत. यामध्ये 3040 mAh बॅटरी आहे. 

Infinix Smart 4 Plus
इनफिनिक्स स्मार्ट 4 प्लसमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज देण्यात आलं आहे. याची किंमत 7 हजार 999 रुपये असून फोन अँड्रॉइड बेसड XOS 6.2 वर चालतो. स्टोरेज मायक्रो एसडी कार्डने वाढवता येतं. फोनचा डिस्प्ले 6.82 इंचाचा आहे. तसंच 13 मेगापिक्सल प्रायमरी रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन ग्रीन, पर्पल आणि ग्रे कलरमध्ये उपलब्ध आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: best smartphones 2020 price less than 10 thousand see list