
Best Smartwatch: २०२२ मधील 'या' आहेत बेस्ट स्मार्टवॉच, फीचर्स एकापेक्षा एक भन्नाट; किंमत कमी
Best Smartwatch under 5000: गेल्याकाही महिन्यात स्मार्टवॉचची मागणी प्रचंड वाढली आहे. अनेकजण स्टाइलिश लूकसोबतच हेल्थ फीचर्समुळे देखील स्मार्टवॉचला खरेदी करण्यास प्राधान्य देतात. बाजारात ५ हजारांच्या बजेटमध्ये येणारे अनेक शानदार स्मार्टवॉच उपलब्ध आहे. यावर्षात लाँच झालेल्या सर्वोत्तम टॉप-५ विषयी सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचा: काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये
OnePlus Nord Watch
OnePlus Nord Watch ची किंमत ४,९९९ रुपये आहे. वॉचमध्ये १.७८ इंच एमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. यामध्ये हार्ट रेट, स्लीप, SpO2 आणि स्टेप ट्रॅकरसारखे अनेक शानदार हेल्थ फीचर्स मिळतील.
Gizmore GizFit Glow Luxe
Gizmore GizFit Glow Luxe वॉचला तुम्ही फक्त ३,४९९ रुपयात खरेदी करू शकता. यामध्ये १.३२ इंच HD AMOLED डिस्प्ले दिला असून, याची पीक ब्राइटनेस ५०० निट्स आहे. या वॉचमध्ये तुम्हाला ब्लूटूथ कॉलिंगचा देखील सपोर्ट मिळेल.
हेही वाचा: TVS Bike: अवघ्या ७ हजारात तुमची होईल 'ही' शानदार बाईक, माइलेज खूपच जबरदस्त
Amazfit Bip 3 Smartwatch
Amazfit ची ही स्मार्टवॉच फक्त २,७९९ रुपयात उपलब्ध आहे. वॉच ६० पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोड, १.६९ इंच शानदार डिस्प्ले आणि 5ATM वॉटर रेसिस्टेंट रेटिंगसह येते.
Realme Watch 3 Pro
Realme च्या या वॉचला खरेदी करण्यासाठी तुम्हाला ४,४९९ रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये शानदार एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय, बिल्ट-इन GPS चा सपोर्ट मिळतो. रियलमीची ही वॉच जबरदस्त फीचर्ससह येते.
Noise NoiseFit Evolve 3 Smartwatch
Noise NoiseFit Evolve 3 Smartwatch फक्त ३,४९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. वॉचमध्ये १.४३ इंच डिस्प्ले, ब्लूटूथ कॉलिंग सपोर्टसह एकापेक्षा एक शानदार हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत.
हेही वाचा: Top Companies: महिलांना काम करण्यासाठी बेस्ट आहेत 'या' टॉप-१० कंपन्या, पाहा लिस्ट