HP Victus 16 : ‘गेमिंग’साठी सुपर‘कूल’ लॅपटॉप

‘एचपी’ने नुकताच गेमिंगमध्ये तगडा परफॉर्मन्स देणारा व्हिक्टस १६ हा लॅपटॉप लाँच केले
‘गेमिंग’साठी सुपर‘कूल’ लॅपटॉप
‘गेमिंग’साठी सुपर‘कूल’ लॅपटॉपsakal

- वैभव गाटे

गेमिंग इंडस्ट्री भारतात बूस्ट घेत आहे, हे ओळखून लॅपटॉप निर्माण करणाऱ्या कंपन्या आता गेमिंग लॅपटॉपवर विशेष लक्ष केंद्रित करू लागल्या आहेत. त्यातील काही अग्रेसर कंपन्यांपैकी एक ‘एचपी’. 

‘एचपी’ने नुकताच गेमिंगमध्ये तगडा परफॉर्मन्स देणारा व्हिक्टस १६ हा लॅपटॉप लाँच केले. ज्यात फास्ट परफॉर्मन्ससाठी ओळखला जाणारा एएमडी प्रोसेसर आणि वेगवान कूलिंग टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. यातील ‘व्हिक्टस १६’ या टफ बॉडी, टफ परफॉर्मन्स असलेल्या लॅपटॉपचा घेतलेला रिव्ह्यू.

‘व्हिक्टस १६’च्या बॉक्समध्ये आपल्याला गेमिंगला शोभेल असा स्मार्ट डिझाइन असलेला लॅपटॉप आणि भला मोठा असा तब्बल २०० वॉटचा वेगवान चार्जर मिळतो.

डिझाइनबद्दल... लॅपटॉपचे हाय क्वालिटी प्लास्टिक पॉली-कर्बन मटेरिअल आणि व्हिक्टसचा ‘व्ही’ बॅज संपूर्ण लॅपटॉपला प्रीमियम लूक देतो. लॅपटॉपचे एजेस आणि कॉर्नर सॉफ्ट ठेवण्यात आले आहेत. शिवाय लॅपटॉपची बॉडी स्क्रॅच रेझिस्टंट आहे. थिकनेसमुळे हा लॅपटॉप गेमिंगसाठी आणि इतर कामांसाठी सॉलिड वाटतो. मायका सिल्वर आणि परफॉर्मेन्स ब्ल्यू या रंगांमध्ये हा लॅपटॉप उपलब्ध आहे.

लॅपटॉपला १६.१ इंचाचा फुल एचडी एलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेमध्ये २५० नीट्सचा ब्राइटनेस असून, १४४ हर्ट्‌झचा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. तसेच, जेव्हा तुम्ही गेमिंगव्यतिरिक्त अन्य कामासाठी लॅपटॉप वापरणार असाल, तेव्हा रिफ्रेश रेट ६० हर्ट्‌झ करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. डिस्प्लेमध्ये अँटी ग्लेअर पॅनलसह १७८ डिग्रीचा व्हिविंग अँगल देण्यात आला आहे. कूलिंग टेक्नॉलॉजीमुळे गेमिंगवेळी लॅपटॉप स्क्रीन आणि बॉडी वेगाने कूल होते.

लॅपटॉप पोर्ट्‌स ः ३ यूएसबी टाइप ए, १ यूएसबी टाइप सी, १ एचडीएमआय, १ RJ-४५ लॅन पोर्ट, १ ऑडिओ जॅक देण्यात आले आहेत. मात्र, कमतरता जाणवते ती एसडी कार्ड पोर्टची. यामुळे युजर्सची थोडी निराशा होऊ शकते.

स्पीकर ः  लॅपटॉपमध्ये ‘बी अँड ओ’चे बेस्ट कॉलिटी २ स्टिरिओ स्पीकर मिळतात, ज्याच्या दमदार आवाजामुळे गेमिंगवेळी गेमर्सचा अनुभव आणखी खास होतो. शिवाय, मूव्ही वॉचिंगचा अनुभवही बेस्ट ठरतो. 

कीबोर्ड ः नम बटण असलेल्या फुल साइज कीबोर्डमध्ये आकर्षक आरजीबी बॅक लाइट मिळतात, ज्या तुम्ही बदलूही शकता. स्पेसिफिकेशन

प्रोसेसर - एएमडी रायझन ७ ७८४० एचएस, विंडोज ११, ६४ बीट्स, ५१२ जीबी एसएसडी कार्ड , १६ जीबी रॅम, ग्राफिक कार्ड- एनविडिया जी-फोर्स आरटीएक्स ३०५० ६ जीबी

किंमत : ८६,९९९ रुपयांपासून सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com