Best SUVs: अपघातानंतरही होईल बचाव! देशातील 'या' SUV ना मिळालय ५ स्टार सेफ्टी रेटिंग

तुम्ही जर सुरक्षेच्या दृष्टीने चांगली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ५ स्टार रेटिंगसह येणाऱ्या अनेक चांगल्या एसयूव्ही बाजारात उपलब्ध आहेत.
SUV
SUVSakal
Updated on

Best SUVs With 5 Star Rating: रस्ते अपघाताच्या घटना सर्रास कानावर येत असतात. त्यामुळे अनेकजण कार खरेदी करताना सर्वात प्रथम सेफ्टी फीचर्सची माहिती घेतात. कोणत्याही कारच्या सेफ्टीबाबत जाणून घेण्यासाठी एनसीएपी क्रॅश टेस्ट सेफ्टी रेटिंग माहिती करून घ्यावी. 5 स्टार सेफ्टी रेटिंगसह येणाऱ्या भारतातील अशाच शानदार एसयूव्हीबद्दल जाणून घ्यावी.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

MAHINDRA SCORPIO-N
MAHINDRA SCORPIO-NSakal

MAHINDRA SCORPIO-N

महिंद्राच्या स्कॉर्पियो एनची काही दिवसांपूर्वी क्रॅश टेस्ट केली. ग्लोबल एनसीएपीद्वारे करण्यात आलेल्या क्रॅश टेस्टमध्ये कारला अ‍ॅडल्ट ऑक्यूपेशनसाठी ५ स्टार सेफ्टी रेटिंग, तर लहान मुलांसाठी ४ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. SUV मॉडेल लाइनअप २.२ लीटर टर्बो डिझेल आणि २.० लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह येते.

MAHINDRA XUV700

MAHINDRA XUV700 ची नोव्हेंबर २०२१ मध्ये क्रॅश टेस्ट करण्यात आली होती. यावेळी कारला ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले होते. XUV700 मध्ये २.२ लीटर mHawk डिझेल आणि २.० डिझेल mStallion टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

SUV
Smartphone Offer: पहिल्याच सेलमध्ये स्वस्तात मिळतोय ८ जीबी रॅमसह येणारा फोन, फक्त ११ हजारात करा खरेदी
MAHINDRA XUV300
MAHINDRA XUV300

MAHINDRA XUV300

MAHINDRA XUV300 ला ग्लोबल NCAP ने क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार सेफ्टी रेटिंग दिले आहे. या सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीला अ‍ॅडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनमध्ये ५ स्टार आणि चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी ४ स्टार रेटिंग मिळाले आहे. कार १.५ लीटर डिझेल आणि १.२ लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह येते.

TATA NEXON

TATA NEXON ही सर्वाधिक विक्री होणारी डिझेल एसयूव्ही आहे. कारला अ‍ॅडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनमध्ये ५ स्टार आणि चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी ३ स्टार मिळाले आहेत. कार १.२ लीटर टर्बो पेट्रोल आणि १.५ डिझेल इंजिन पर्यायासह येते.

TOYOTA FORTUNER
TOYOTA FORTUNERSakal

TOYOTA FORTUNER

टोयोटा फॉर्च्यूनरला ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. कारला अ‍ॅडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनमध्ये ३६ पैकी ३४.०३ पॉइंट्स आणि चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी ४९ पैकी ४३.३८ पॉइंट्स मिळाले आहेत. TOYOTA FORTUNER २.७ लीटर पेट्रोल आणि २.८ लीटर डिझेल इंजिनसह येते.

SUV
Tech layoffs 2022: नक्की चाललय काय? Amazon, Twitter नंतर आणखी एका टेक कंपनीने दिला ४ हजार जणांना नारळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com