Cyber Dost : फसवणुकीचा नवा फंडा! सुरक्षेसाठी लिंक स्कॅन करा असा मेसेज अन् मिनिटांत फोन हॅक, नेमका विषय जाणून घ्या

Cyber Dost Security Tips : सायबर गुन्हेगार बनावट डिलिव्हरी मेसेजद्वारे नागरिकांची फसवणूक करत आहेत. सायबरडोस्टने दिलेल्या सूचनांनुसार, अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका व वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
Cyber Dost Security Tips
Cyber Dost Security Tipsesakal
Updated on

डिजिटल जगात रोज नवनव्या फसवणुकीच्या आयडिया वापरून सामान्य लोकांना गंडवण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. अशाच एका नव्या सायबर फसवणुकीचा खुलासा भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या सायबर सुरक्षेच्या संस्थेने सायबरदोस्त आय4सी (CyberDost I4C) ने केला आहे. त्यांनी नागरिकांना या प्रकाराबद्दल तातडीने सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

फसवणुकीची नवी आयडिया

सायबर गुन्हेगार आता एक नवा प्रकार वापरत आहेत. ते लोकांना बनावट डिलिव्हरी संबंधित मेसेज पाठवतात, ज्यामध्ये डिलिव्हरीसाठी पत्ता अपडेट करण्याची विनंती केली जाते. या मेसेजमध्ये एक लूक-अलाइक (खोटे पण खरा दिसणारे) लिंक दिली जाते. वापरकर्ता जर त्या लिंकमध्ये दिलेल्या वेबसाइटवर गेला, तर त्याला खोटी वेबसाइट दिसते, जिचा इंटरफेस अगदी मूळ वेबसाइटसारखा असतो.

यामध्ये वापरकर्त्याकडून वैयक्तिक माहिती, बँक तपशील व ओटीपी मागितले जातात. एकदा का वापरकर्त्याने ही माहिती भरली की सायबर गुन्हेगार काही सेकंदांत त्याचे बँक खाते रिकामे करतात.

सायबरडोस्टने दिला इशारा

सायबरडोस्टने त्यांच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून नागरिकांना सावध करत सांगितले की,

  • अज्ञात किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.

  • असत्यापित डिलिव्हरी संदेशावर विश्वास ठेवू नका.

  • फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार नोंदवा.

Cyber Dost Security Tips
Motorola Edge 50 Discount : डिस्काउंटचा पाऊस! 28 हजारचा मोबाईल मिळतोय 15 हजारात; या बड्या कंपनीने आणली ऑफर, पाहा एका क्लिकवर..

सायबर सुरक्षेसाठी खास टिप्स

लिंक स्कॅनर वापरा

'व्हायरस टोटल', 'गुगल सेफ ब्राउझिंग', 'URLVoid' यांसारख्या मोफत टूल्सचा वापर करून तुम्ही कोणतीही लिंक सुरक्षित आहे की नाही ते तपासू शकता.

URL काळजीपूर्वक तपासा

जर कोणताही मेसेज Amazon, Flipkart किंवा इतर सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या नावाने आलेला असेल, तर त्यांच्या ऑफिशियल वेबसाइटचा पत्ता (URL) नीट तपासा. बनावट वेबसाईटमध्ये एक अक्षरही वेगळे असू शकते.

Cyber Dost Security Tips
AI Data Theft : मोबाईलमधला AI चोरतोय तुमचा पर्सनल डेटा! संशोधनातून धक्कादायक माहिती समोर; कसं सुरक्षित राहाल? जाणून घ्या

वैयक्तिक माहिती शेअर करू नका

आपला मोबाइल नंबर, बँकिंग तपशील, डेबिट/क्रेडिट कार्ड माहिती आणि OTP कोणत्याही लिंकमध्ये भरू नका.

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करा

आपले बँक खाते किंवा ईमेल अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरणे अत्यंत गरजेचे आहे.

सध्या सायबर गुन्हेगार अत्यंत हुशारीने बनावट लिंक, संदेश व वेबसाइट तयार करत आहेत. अशा वेळी नागरिकांनीही सावधगिरीचा उपाय म्हणून प्रत्येक मेसेजकडे शंका घेण्याची वृत्ती ठेवणे गरजेचे आहे. कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी ती खरी आहे की नाही हे पडताळणे अत्यावश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com