AI Data Theft : मोबाईलमधला AI चोरतोय तुमचा पर्सनल डेटा! संशोधनातून धक्कादायक माहिती समोर; कसं सुरक्षित राहाल? जाणून घ्या

AI Personal Data Theft Research : आजकाल एआय टूल्स वापरकर्त्यांची माहिती गोळा करून त्यावर आधारित सेवा देतात. आपल्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी काही महत्वाचे उपाय अवलंबणे आवश्यक आहे.
AI Personal Data Theft Research
AI Personal Data Theft Researchesakal
Updated on

AI Data Theft Research : आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेले आहे. ChatGPT, Microsoft Copilot यांसारख्या AI सहाय्यकांपासून ते स्मार्टवॉचमधून फिटनेस डेटा ट्रॅक करणाऱ्या तंत्रज्ञानापर्यंत, आपण दररोज वेगवेगळ्या एआय प्रणालींशी संपर्कात येत असतो. या तंत्रज्ञानामुळे जरी आपल्या जीवनात सुलभता आली असली, तरी यामुळे आपल्या वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

AI टूल्स तुमचा डेटा कसा गोळा करतात?

वेस्ट व्हर्जिनिया विद्यापीठाचे सायबरसुरक्षा विषयाचे सहाय्यक प्राध्यापक ख्रिस्तोफर रामेझान यांनी स्पष्ट केले की, एआय टूल्स दोन प्रकारे माहिती गोळा करतात जनरेटिव्ह AI आणि प्रेडिक्टिव्ह AI.

  • जनरेटिव्ह AI, जसे की ChatGPT किंवा Google Gemini, यामध्ये वापरकर्त्याने टाकलेला प्रत्येक प्रश्न, उत्तर आणि सूचनांचा मजकूर गोळा केला जातो. ही माहिती पुढील प्रशिक्षणासाठी वापरली जाते, जरी वापरकर्ता कंटेंट ट्रेनिंगसाठी ‘opt out’ केलेला असला तरीही काही मूलभूत माहिती कंपनीकडे साठवली जाते.

  • प्रेडिक्टिव्ह AI सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जसे की Facebook, Instagram, TikTok यावर आपल्या प्रत्येक कृतीवर (पोस्ट, लाईक, कमेंट, व्हिडिओ बघण्याचा वेळ) नजर ठेवून आपले डिजिटल प्रोफाइल तयार करतात आणि आपल्या वर्तनाचे अंदाज बांधतात.

AI Personal Data Theft Research
सरकारचा अलर्ट! Google Play Store वरून पटकन डिलिट करून टाका हे डेंजर अ‍ॅप; नाहीतर हॅक होऊ शकतो तुमचा मोबाईल

स्मार्टवॉच, फिटनेस ट्रॅकर्स, स्मार्ट स्पीकर्स हे उपकरणे आवाज, लोकेशन, बायोमेट्रिक माहिती गोळा करतात. ही माहिती बहुतांश वेळेस ‘क्लाऊड’वर साठवली जाते आणि अज्ञात पद्धतीने प्रोफाइलिंगसाठी वापरली जाते. वापरकर्त्यांनी किती पावले चालले, हृदयाचे ठोके, झोपेचे विश्लेषण हे सगळं माहितीच्या स्वरूपात कंपन्यांच्या हाती जाते.

AI टूल्सद्वारे संकलित माहिती केवळ एखाद्या विश्वासार्ह कंपनीकडे साठवली जातेच असे नाही, ती थर्ड पार्टीला विकली किंवा शेअरही केली जाऊ शकते. त्यामुळे माहिती चोरी, सायबर हल्ले, आणि गोपनीयतेचा भंग होण्याचा धोका वाढतो. रामेझान सांगतात की, या डेटा संकलन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वापरकर्त्यांना माहिती देण्यासाठी आजही अनेक देशांच्या कायद्यात सुधारणा गरजेच्या आहेत.

AI Personal Data Theft Research
Motorola Edge 50 Discount : डिस्काउंटचा पाऊस! 28 हजारचा मोबाईल मिळतोय 15 हजारात; या बड्या कंपनीने आणली ऑफर, पाहा एका क्लिकवर..

ज्यावेळी आपण एखादा अ‍ॅप किंवा सेवा वापरण्यास सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला 'Terms of Service' वाचायला सांगितलं जातं. पण एका अभ्यासानुसार सरासरी व्यक्ती फक्त ७३ सेकंद यासाठी देतो, जे किमान अर्धा तास लागणारे दस्तऐवज असतात. यातच आपण आपल्या माहितीच्या वापराबाबत संमती दिली असते.

आपली गोपनीयता जपण्यासाठी उपाय काय?

  1. वैयक्तिक माहिती शेअर करण्यास टाळा-AI टूल्समध्ये नाव, जन्मतारीख, घरचा पत्ता, आधार क्रमांक यासारखी माहिती कधीही टाकू नका.

  2. प्रोफेशनल डेटा सुरक्षित ठेवा-कामाच्या ठिकाणी गोपनीय कागदपत्रे किंवा माहिती AI चॅटबॉक्समध्ये शेअर करू नका.

  3. स्मार्ट डिव्हाइसेस सतत ‘ऐकत’ असतात-स्मार्ट स्पीकर्स, स्मार्टफोन किंवा इतर डिव्हाइसेस स्लीप मोडमध्ये असतानाही सक्रिय असतात. खासगी संवाद किंवा काम करताना हे उपकरण बंद किंवा अनप्लग करून ठेवावेत.

  4. अटी नीट समजून घ्या-आपल्याकडे कोणती माहिती कशी गोळा होते, कुठे साठवली जाते, याचा तपशील जाणून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com