तुम्ही बनावट पेटीएम ॲप वापरताय का? काळजी घ्या, अन्यथा होऊ शकते फसवणूक

Beware of Fake Paytm App Fraud
Beware of Fake Paytm App Fraud

Paytm spoof app : आता जवळपास सगळीकडे डिजिटलायझेशन आणि ऑनलाइन पेमेंटला (Online Payment) भरपूर प्रोत्साहन दिले जात आहे. सध्या ऑनलाइन पेमेंटसाठी पेटीएम ॲप (Paytm APP, गुगल पे ॲप (Google Pay), फोनपे ॲप (Phonepay) आणि इतर UPI ॲप्स बाजारात उपलब्ध आहेत. हे ॲप्स सुरक्षित पेमेंटसाठी (Secure Online Payment) वापरले जात असले तरी डिजिटल पेमेंट करताना ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रमाण खूप वाढत आहे, त्यामुळे दुकानदारांनी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. (Beware of Fake Paytm App Fraud)

पेटीएमद्वारे दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला एका बनावट पेटीएम अॅप सापडले आहे. पेटीएमने म्हटले आहे की आम्हाला कळले आहे की सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये पेटीएम स्पूफ बद्दल सांगितले गेले आहे , पेटीएम सारखेच अॅप Paytm Spoof/Look-alike जे वापरकर्त्यांना चुकीच्या पेमेंट कंशरमेशन पेजवर घेऊन जाते

हे बनावट पेटीएम ॲप पेमेंट कंशरमेशन पेजचा वापर खरेदीदारांची फसवणूक करण्यासाठी केला जात आहे. पेटीएम ॲपशी सध्या सुमारे 23 दशलक्ष व्यापारी जोडले गेलेले आहेत. यापैकी कोणाचीही अशा पध्दतीने फसवणूक केली जाऊ शकते. पेटीएमने सांगितले की, अशा अनेक पद्धती आहेत ज्या वापरुन दुकानदार पेमेंट पावती व्हेरिफाय करू शकतात.

पेमेंट कंन्फम करण्यासाठी पद्धती

1. एसएमएस नोटिफिकेशन

2. Paytm for Business ॲपसाठी पेटीएमद्वारे ॲपमध्ये नोटिफिकेशन पाठवलं जातं

3. Paytm साउंड बॉक्स

Beware of Fake Paytm App Fraud
फोनमध्ये इंटरनेट नसताना देखील करा डिजिटल पेमेंट, जाणून घ्या पध्दत

ग्राहकांसाठीअशा प्रकारची फसवणूक टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पेमेंट कंफर्मेशनसाठी बँकेच्या मेसेजची वाट पाहा. जोपर्यंत तुम्हाला बँकेकडून मेसेज किंवा तुमच्या फोनवर नोटिफीकेशन मिळत नाही तोपर्यंत पेमेंट पूर्ण झाले आहे असे मानू नका.

पेटीएम साउंडबॉक्स पेटीएम क्यूआर कोडवर अनेक पेमेंट ऑप्शन पेमेंटला सपोर्ट करतो जसे की, पेटीएम वॉलेट, डेबिट आणि क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, भीम UPI, आणि Paytm QR कोड. अशा परिस्थितीत फीचर फोन असलेल्या छोट्या व्यापाऱ्यांना एसएमएस किंवा ग्राहकांच्या स्क्रीनशॉटवर अवलंबून राहण्याची गरज नाही. पेटीएम वापरणाऱ्या व्यापारी किंवा दुकानदारांना याद्वारे पेमेंट कंफर्मेशन मिळू शकते.

Beware of Fake Paytm App Fraud
Jio चा सगळ्यात स्वस्त प्लॅन, 400 पेक्षा कमीत 84 दिवस व्हॅलिडिटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com