esakal | Windows, iPhone आणि Android वापरकर्त्यांसाठी धोक्याचा इशारा; दुर्लक्ष करणं पडेल महागात
sakal

बोलून बातमी शोधा

Mobile Network

भारत सरकारने अॅपल आयफोन, अँड्रॉईड मोबाईल फोन आणि विंडोजच्या सर्व युजर्संना सतर्क केले आहे. सरकारच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास युजर्संना मोठा फटका बसू शकतो.

Windows, iPhone आणि Android साठी धोक्याचा इशारा; दुर्लक्ष करणं पडेल महागात

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारत सरकारने अॅपल आयफोन, अँड्रॉईड मोबाईल फोन आणि विंडोजच्या सर्व युजर्संना सतर्क केले आहे. सरकारच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास युजर्संना मोठा फटका बसू शकतो. सायबर सेक्युरेटी एजेन्सी CERT-In ने ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या विंडोज OS, गूगल अँड्रोईड मोबाईल आणि अॅपल सॉफ्टवेअर इकोसिस्टिम असुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. याचा फायदा घेत सायबर गुन्हेगार डिवाईस हॅक करु शकतात. या धोक्यापासून वाचण्यासाठी अॅपल, अँड्रोईड आणि विंडोज युजर्संनी काही पाऊलं उचलणं आवश्यक बनलंय. चांगली बाब म्हणजे अॅपल आणि गूगलने यावर मात करण्यासाठी काही सॉफ्टवेअर आणले आहेत. डिवाईस सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टिमचे लेटेस्ट वर्जन अपडेट करण्याची गरज आहे. (Beware Windows Apple iPhone Android mobile phone users Indian govt has posted bug alert)

Android

CERT-In ने म्हटलंय की, अँड्रोईडच्या एका अॅप्लिकेशनमध्ये असुरक्षितता आढळून आली आहे. या माध्यमातून तुमच्या नकळत फोटो कुणालाही पाठवले जाऊ शकतात. त्यामुळे एजेन्सीने युजर्संना गूगल प्ले स्टोअरवरुन Version 5.17.3 डाऊनलोड करण्यासाचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा: दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णा भाऊ साठेंचे असामान्य लेखन

Windows

असुरक्षित असलेल्या विंडोज सिस्टिममधून सायबर गुन्हेगार तुमचे पासवर्ड मिळवू शकतात. सायबर गुन्हेगार Windows 10 Version 1809 32-bit सिस्टिम, ARM64-based सिस्टिम आणि x64-based सिस्टिम, Windows 10 Version 1909 32-bit सिस्टिम, ARM64-based सिस्टिम आणि x64-based सिस्टिम, Windows 10 Version 2004 32-bit सिस्टिम, ARM64-based सिस्टिम आणि x64-based सिस्टिम, Windows 10 Version 20H2 32-bit सिस्टिम, ARM64-based सिस्टिम आणि x64-based सिस्टिम, Windows 10 Version 21H1 32-bit सिस्टिम, ARM64-based सिस्टिम आणि x64-based सिस्टिम, Windows Server 2019, Windows Server 2019 आणि Windows Server, version 2004 यावर हल्ला करु शकतात आणि तुमची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. असे असले तरी विंडोजने दिलेल्या माहितीनुसार, अद्याप कोणत्याही युजर्सच्या डिवाईसवर हल्ला करण्यात आलेला नाही.

हेही वाचा: गाई आणि माई...

Apple devices

CERT-In एजेन्सीने iOS आणि iPadOS असुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. सायबर गुन्हेगार काही अॅप्सच्या मदतीने डिवाईसचा ताबा मिळवू शकतात. याचा परिणाम 11.5.1, Apple iOS आणि iPadOS versions 14.7.1 च्या आधिचे, iPhone 6s आणि नंतरचे , iPad Pro (सर्व मॉडेल), iPad Air 2 आणि नंतरचे, iPad 5th जनरेशन आणि नंतरचे, iPad mini 4 आणि नंतरचे, iPod touch (7th जनरेशन ) आणि macOS Big Sur या डिवाईसवर पाहायला मिळू शकतो. Apple ने नुकतेच या धोक्यापासून बचावासाठी सेक्युरिटी अपडेट्स आणले आहेत.

loading image
go to top