स्वस्तातले स्मार्टफोन! 5 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत 4G मोबाइल

smartphone below 5 thousand with 4 g connectivity
smartphone below 5 thousand with 4 g connectivity

पुणे - तुम्हाला नवा 4जी फोन खरेदी करायचा आहे आणि स्वस्तातला हवा असेल तर अनेक पर्याय आहेत. नोकिया, शाओमीचे अनेक मोबाइल 5 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात. दुसरा एखादा साधा मोबाइल घेण्याऐवजी हे स्वस्तातले स्मार्टफोन पर्याय ठरू शकतात. यामध्ये फोरजी कनेक्टिव्हिटीसह इतरही अनेक फीचर्स आहेत. 

Nokia 2.1, किंमत - 4,828 रुपये
नोकियाच्या या फोनमध्ये 5.5 इंचाचा डिस्प्ले आहे. अॅड्राइड वन सर्टिफिकेशन असलेल्या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसर दिला आहे. तसंच याची बॅटरी क्षमता 4000mAh इतकी आहे. 1 जीबी रॅम यामध्ये देण्यात आली आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा रिअर आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Xiaomi Redmi Go,  किंमत - 4,740 रुपये
शाओमीच्या रेडमी सिरीजमधील हा फोन अँड्रॉइड गो सपोर्टसह येतो. यामध्ये 5 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. 1 जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर यामध्ये आहे. फोनची बॅटरी 3000mAh इतकी आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.  

Lava Z60S किंमत 4,990 रुपये
लाव्हाच्या या स्मार्टफोनमध्ये 1 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. यात 1.1GHz चा मीडियाटेक प्रोसेसर देण्यात आला आहे. फ्रंट आणि रिअर दोन्ही कॅमेरे 5 मेगापिक्सलचे आहेत. अँड्रॉइड गोसह असलेल्या या फोनची बॅटरी 2500mAh इतकी आहे.

Infocus Bingo 10 , किंमत: 4,500 रुपये
फोनचा डिस्पले 4.5 इंचाचा आहे. क्वाड कोर मीडियाटेक चिपसेटच्या प्रोसेसरसह 1 जीबी रॅम या फोनमध्ये आहे. याशिवाय 8 जीबी स्टोरेजही देण्यात आलं आहे. 5 मेगापिक्सलचा फ्रंट आणि 5 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आहे. 2000mAh ची बॅटरी या फोनमध्ये आहे. 

Lava Z51, किंमत - 4,099 रुपये
लावाच्या या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा रिअर आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 5 इंचाचा डिस्प्ले असून 2500mAh ची बॅटरी दिली आहे. 1 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल स्टोरेज या फोनमध्ये आहे. क्वाड कोर प्रोसेसर देण्यात आला असून 10 भारतीय भाषा यामध्ये आहेत. 

Nokia 1, किंमत - 3,999 रुपये
गो एडिशन अँड्रॉइडसह असलेल्या या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा रिअर आणि 2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या डिव्हाइसमध्ये 2150mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 4.5 इंचाचा एचडी डिस्प्ले यामध्ये दिला आहे. नोकियाच्या या स्मार्टफोनमध्ये 1 जीबी रॅम आणि 8 जीबी स्टोरेजसह मिळतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com