Recharge Plans: भन्नाट प्लॅन्स! एकाच रिचार्जमध्ये घरातील ५ जणांना मिळेल कॉलिंग-डेटाचा फायदा; Netflix-Hotstar फ्री

टेलिकॉम कंपनी एअरटेलकडे शानदार बेनिफिट्ससह येणारे दोन प्रीपेड प्लॅन्स उपलब्ध आहेत. या प्लान्समध्ये ओटीटी सबस्क्रिप्शन मोफत मिळेल.
Airtel
AirtelSakal

Bharti Airtel Best Postpaid Plans: देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या Bharti Airtel कडे कमी किंमतीत येणारे अनेक शानदार प्लॅन्स उपलब्ध आहेत. कंपनी प्रत्येक ग्राहकांच्या गरजेनुसार वेगवेगळे प्लॅन ऑफर करते. कंपनीकडे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्सची मोठी लिस्ट उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये तुम्हाला ओटीटी बेनिफिट्स देखील मिळतील.

Airtel च्या पोस्टपेड प्लॅन्समध्ये तुम्हाला Netflix, Amazon Prime Video आणि Disney+ Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. त्यामुळे तुम्हाला ओटीटीसाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. Airtel च्या या दोन प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

Airtel चा १,१९९ रुपयांचा प्लॅन

Airtel कडे १,१९९ रुपयांचा शानदार पोस्टपेड प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला Disney+ Hotstar, Amazon Prime Video आणि Netflix चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. तसेच, १ नियमित कनेक्शनसह ३ अ‍ॅड-ऑन कनेक्शन देखील मिळतात. पोस्टपेड प्लॅनमध्ये १५० जीबी डेटा आणि प्रत्येक अ‍ॅड-ऑन कनेक्शनला ३०जीबी डेटाचा फायदा मिळेल.

तसेच, २०० जीबीपर्यंत डेटा रोलओव्हरची सुविधा दिली जाते. प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसचा फायदा मिळेल. Airtel च्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये ६ महिन्यांसाठी Amazon Prime Video चा मोफत अ‍ॅक्सेस दिला जातो. Disney+ Hotstar Mobile चे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन मिळते. Wynk Premium चे देखील मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.

Airtel
Success Story: पुणेकर तरुणाची कमाल! मातीशिवाय उगवलं 'केशर', महिन्याला लाखोंची कमाई

Airtel चा १,४९९ रुपयांचा प्लॅन

Airtel कडे १,४९९ रुपये किंमतीचा शानदार प्लॅन उपलब्ध आहे. या पोस्टपेड प्लॅनमध्ये १ नियमित व ४ फॅमिली अ‍ॅड-ऑन कनेक्शनची सुविधा मिळेल. याशिवाय, २०० जीबी डेटा आणि प्रत्येक अ‍ॅड-ऑन कनेक्शनसाठी ३० जीबी डेटा दिला जातो. यात २०० जीबी डेटा रोलओव्हर, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएस दिले जातात.

पोस्टपेड प्लॅनमध्ये ६ महिन्यांसाठी Amazon Prime Video, १ वर्षासाठी Disney+ Hotstar Mobile आणि Netflix Standard मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.

हेही वाचा: Tesla Cybertruck: कन्फर्म! भारतीय रस्त्यांवर दिसणार टेस्लाचा सायबरट्रक, ८००Km रेंज अन् बरचं काही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com