Airtel Satellite Internet : स्पेस एक्स अन् जिओला मात देणार एअरटेल? सॅटेलाईट इंटरनेटसाठी In-Space कडून मिळाली परवानगी

Airtel OneWeb : इन-स्पेस संस्थेची परवानगी मिळवणारी वनवेब ही पहिलीच कंपनी आहे.
Airtel Satellite Internet
Airtel Satellite InterneteSakal

EutelSat OneWeb gets in-space approval : भारती एअरटेलच्या युटेलसॅट वन-वेबला कमर्शिअल सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवेच्या लाँचिंगसाठी इन-स्पेसकडून आवश्यक परवानगी मिळाली आहे. इन-स्पेस ही सरकारी एजन्सी अंतराळातील क्रियाकल्पांचे नियमन करते. या संस्थेची परवानगी मिळवणारी वनवेब ही पहिलीच कंपनी आहे.

युटेलसॅट वनवेब ही कंपनी युटेलसॅट समूहाचा भाग आहे. या समूहामध्ये तब्बल 648 उपग्रह आहेत, जे पृथ्वीच्या खालच्या कक्षेत फिरतात. यांच्या मदतीने भारतात साधारणपणे 21 Gbps वेगाने इंटरनेट पुरवठा केला जाऊ शकतो.

स्पेक्ट्रम परवानगी आवश्यक

इन-स्पेस संस्थेची परवानगी मिळाली असली, तरी भारतात अद्याप एअरटेलचं सॅटेलाईट इंटरनेट सुरू होण्यास वेळ लागणार आहे. कारण अद्याप एकाही कंपनीला भारत सरकारने सॅटेलाईट इंटरनेट स्पेक्ट्रमचे हक्क दिलेले नाहीत. या स्पेक्ट्रमचं वाटप करायचं की लिलाव करायचा याबाबत अद्याप निर्णय होणं बाकी आहे. (Tech News)

Airtel Satellite Internet
Satellite Spectrum : मस्क-अंबानी वादात पंतप्रधानांची उडी? सॅटेलाईट स्पेक्ट्रमबाबत मोदी घेतील अंतिम निर्णय - रिपोर्ट

कानाकोपऱ्यात हायस्पीड इंटरनेट

यूटेलसॅट वनवेबच्या माध्यमातून भारती एअरटेल हे देशाच्या कानाकोपऱ्यात इंटरनेट सेवा पुरवण्याच्या प्रयत्नात आहे. ज्या ठिकाणी मोबाईल टॉवर किंवा ब्रॉडबँड पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणी देखील सॅटेलाईटच्या माध्यमातून इंटरनेट पोहोचवता येणं शक्य होणार आहे.

दूरसंचार विभागाने यापूर्वीच वनवेब इंडियाला आवश्यक तो परवाना दिलेला आहे. त्यांना गुजरात आणि तामिळनाडूमध्ये दोन गेटवे उभारण्याची परवानगी मिळाली आहे. याव्यतिरिक्त रिलायन्स जिओ आणि स्पेसएक्स या कंपन्या देखील भारतात सॅटेलाईट इंटरनेट लाँच करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com