

Unknown Number Identification: मोबाईलवर आता अनोळखी नंबरवरून जरी कॉल आला तरी ज्याचा कॉल आला आहे त्याचं नाव यापुढे दिसणार आहे. त्यामुळे अनोळखी नंबरवरून आलेला कॉल कुणाचा असा प्रश्न समोरच्या व्यक्तीला पडणार नाही. देशात १ नोव्हेंबर २०२६ पासून टेलिकॉम क्षेत्रात काही महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. यात कॉल रिसिव्ह करताना समोरच्या व्यक्तीचे नाव दिसण्याची सुविधा देण्यासंदर्भात महत्त्वाचा बदल लागू होणार आहे.