इलॉन मस्कच्या कामाच्या पद्धतीवर बिल गेट्स यांची टीका, म्हणाले...| Elon Musk | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Elon musk biil gates

Elon Musk: इलॉन मस्कच्या कामाच्या पद्धतीवर बिल गेट्स यांची टीका, म्हणाले...

Bill Gates speaks on Elon Musk: मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरची मालकी आल्यापासून इलॉन मस्क यांनी धक्कातंत्र अवलंबवले आहे. कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यापासून ते प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे बदल करण्यासारखे अनेक निर्णय मस्क यांनी घेतले आहेत. मात्र, त्यांच्या या निर्णयांवर टीका देखील होत आहे. आता मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी मस्क यांच्या कामाच्या पद्धतीवर भाष्य केले आहे.

कोणाचाही सल्ला न घेण्याच्या त्यांच्या धोरणामुळे डिजिटल ध्रुवीकरण बिघडत असल्याचे मत गेट्स यांनी व्यक्त केले आहे. मस्क हे पोलच्या माध्यमातून निर्णय घेत असल्याने ट्विटर एकप्रकारे अडचणीत आहे, असे बिल गेट्स यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: Datsun Redi Go: नववर्ष साजरे करा धुमधडाक्यात, दरमहिना फक्त ८ हजार द्या अन् घरी घेऊन जा ४ लाखांची कार

ट्विटरला खरेदी करण्यापूर्वीच मस्क यांनी प्लॅटफॉर्मवरील बदल सुचवले होते. मात्र, आता अनेक महत्त्वाचे निर्णय कोणताही विचार न करता व ट्विटर पोलच्या माध्यमातून घेत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे ट्विटरचे सीईओ पद सोडावे की नाही, याबाबत देखील पोल घेत त्यांनी सर्वांना धक्का दिला होता.

गेट्स म्हणाले की, सोशल मीडियाने समाजातील हिंसक गोष्टी कमी व्हाव्यात, लस आणि मास्कबाबत चुकीची माहिती पसरू नये यासाठी काम करायला हवे. ट्विटरबाबत विचारले असता ते म्हणाले की, 'आधीच्या तुलनेत आताची स्थिती खूपच अस्पष्ट दिसत आहे. ट्विटरची स्थिती सध्या वाईट आहे. ठराविक लोकांनी मिळून निर्णय घेण्याऐवजी फक्त एकच व्यक्ती कोणताही निर्णय न घेता चुकीच्या पद्धतीने निर्णय घेत असल्याचे दिसून येत आहे.'

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

याआधी देखील गेट्स यांनी मस्क यांच्याबाबत असेच मत व्यक्त केले होते. मस्क यांच्यामुळे ट्विटरवरील फेक न्यूजच्या समस्या अजूनच बिकट होऊ शकते, असे ते कोव्हिड-१९ लसीच्या संदर्भाने म्हणाले होते.

दरम्यान, मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्यापासून प्लॅटफॉर्मवर अनेक बदल पाहायला मिळत आहे. कंपनीने नुकतीच ट्विटर ब्लू ही आपली पेड सबस्क्रिप्शन सर्व्हिस सुरू केली आहे. तसेच, मस्क यांनी ट्विटरचे सीईओपद सोडावे की नाही, यासाठी पोल देखील घेतला होता. या पोलमध्ये बहुतांश यूजर्सने मस्क यांनी पद सोडावे या बाजूने मत दिले होते.

हेही वाचा: Airtel 5G: एअरटेलने पुणेकरांना दिले नववर्षाचे गिफ्ट, शहरात 5G सेवा सुरू; प्लॅनची किंमत फक्त...