नववर्ष साजरे करा धुमधडाक्यात, दरमहिना फक्त ८ हजार द्या अन् घरी घेऊन जा ४ लाखांची कार | | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Datsun Redi Go

Datsun Redi Go: नववर्ष साजरे करा धुमधडाक्यात, दरमहिना फक्त ८ हजार द्या अन् घरी घेऊन जा ४ लाखांची कार

Datsun Redi Go Base Model Details: भारतीय बाजारात स्वस्त कारला नेहमीच मागणी असते. अनेकजण ईएमआयवर कार खरेदी करतात. तुम्ही देखील नववर्षाच्या निमित्ताने नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Datsun Redi Go चा विचार करू शकता. ही Maruti Alto 800 नंंतर देशातील दुसरी सर्वात स्वस्त कार आहे.

Datsun Redi Go कार जबरदस्त माइलेज आणि डिझाइनसह येते. या कारच्या किंमत, इंजिन, माइलेज आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Airtel 5G: एअरटेलने पुणेकरांना दिले नववर्षाचे गिफ्ट, शहरात 5G सेवा सुरू; प्लॅनची किंमत फक्त...

Datsun Redi Go ची किंमत

Datsun Redi Go च्या बेस मॉडेलची सुरुवाती किंमत ३,९७,८०० रुपये आहे. तर ऑन रोड किंमत ४३५,५५१ रुपयांपर्यंत जाते. डॅटसनच्या या कारला रोख रक्कम देऊन खरेदी करायचे असल्यास ४.३६ लाख रुपये खर्च करावे लागतील. तुम्ही कारला ४० हजारांच्या डाउन पेमेंटसह घरी घेऊन जाऊ शकता.

४० हजारांच्या डाउन पेमेंट केल्यास तुम्हाला बँकेकडून ३,९५,५५१ रुपये कर्ज घ्यावे लागतील. यानंतर तुम्हाला ५ वर्ष दरमहिन्याला ८,३६५ रुपये ईएमआय भरावा लागेल.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Datsun Redi Go Base Model चे फीचर्स

Datsun Redi Go च्या बेस मॉडेलमध्ये ७९९ सीसीचे तीन सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ५३.६४ बीएचपी पॉवर आणि ७२ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की, कार प्रती लीटर २०.७१ किमी माइलेज देते. कारमध्ये इतरही शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच, इंटेरियर देखील शानदार आहे.

हेही वाचा: Recharge Plans: जिओचा भन्नाट प्लॅन, 180GB डेटा-अनलिमिटेड कॉलिंगसह मिळतील अनेक फायदे; पाहा किंमत

टॅग्स :carautoAutomobile