
मायक्रोसॉफ्ट नव्हे, या कंपनीचा मोबाईल वापरतात बिल गेट्स; जाणून घ्या
अलीकडच्या काळात अनेकांना सर्वात महागडा स्मार्टफोन खरेदी करायची इच्छा असते. पण तुम्हाला माहित आहे का की, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) कोणता फोन वापरतात? नुकतेच गेट्स यांनी स्वतः याचा खुलासा केला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मायक्रोसॉफ्टचे मालक Microsoft Surface Duo ऐवजी सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 3 हा स्मार्टफोन नियमित वापरतात. 9To5Google ने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, या आठवड्याच्या Reddit AMA दरम्यान, गेट्सने स्वतः ही माहिती दिली. आता हा प्रश्न तुमच्याही मनात येत असेल की बिल गेट्स मायक्रोसॉफ्टऐवजी सॅमसंगचा फोन का वापरतात? चला तर मग जाणून घेऊया...(Bill Gates uses the Samsung Galaxy Z Fold 3 smartphone)
हेही वाचा: Realmeचे शानदार स्मार्टफोन आज होणार लाँच; उत्कृष्ट कॅमेरा, जलद चार्जिंगसह अनेक फिचर्स
गेट्स यांच्याकडे आहे सॅमसंग मोबाईल-
गेट्स यांनी स्पष्ट केले की "माझ्याकडे Android Galaxy Z Fold3 आहे. या स्क्रीनच्या माध्यमातून मला एक उत्तम पोर्टेबल पीसी आणि फोनसह काम करता येतं, दुसरे काहीही नाही." या रिपोर्टमध्ये असं नमूद करण्यात आले आहे की, सॅमसंगची मायक्रोसॉफ्टशी जवळची भागीदारी आहे, त्यामुळे ते हा स्मार्टफोन वापरत असावेत.
खरंतर यापूर्वी बिल गेट्सने सांगितलं होतं की, ते Apple ऐवजी Android स्मार्टफोन वापरतात, परंतु त्यांनी एखाद्या विशिष्ट मॉडेलचा उल्लेख पहिल्यांदाच केला आहे. 2021 मध्ये, क्लबहाऊसवरील मुलाखतीदरम्यान, त्यांनी सांगितलं की, काही Android उत्पादक मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर प्री-इंस्टॉल करतात, तसेच Android, iOS पेक्षा अधिक लवचिक आहे.
परंतु या स्मार्टफोनशिवाय गेट्स इतर कोणते फोन वापरत आहेत हे उघड त्यांनी उघड केलं नाहीत. सॅमसंग व्यतिरिक्त, मोटोरोला जगभरात फोल्डेबल स्मार्टफोन्स विकत आहे, विशेषतः यूएस मध्ये. Huawei फोल्ड करण्यायोग्य स्मार्टफोन्सच्या जगात प्रवेश करत आहे, परंतु डिव्हाइसेस सध्या आशियाई बाजारपेठेपुरते मर्यादित आहेत. Xiaomi, Oppo आणि इतर काही चिनी ब्रँड देखील फोल्ड करण्यायोग्य स्मार्टफोन बनवतात, परंतु ते सॅमसंग सारखे मोठ्या प्रमाणावर विकत नाहीत. आणि ऍपलच्या बाबतीत पुढील काही वर्षांमध्ये फोल्ड करण्यायोग्य स्क्रीनसह आयफोन पाहता येणार नाही.
हेही वाचा: जुना स्मार्टफोन विकून मिळवा चांगली किंमत, फॉलो करा या सोप्या ट्रिक्स
Galaxy Z Fold 4 वर काम करत आहे Samsung !
अलीकडे, Samsung Galaxy Z Fold 4 स्मार्टफोन Z Fold 3 प्रमाणेच डिझाइन असल्याचं दिसलं. पण, मागचा भाग थोडा वेगळा आहे. झेड फोल्ड 3 वर कॅमेरा बंप दिसतो मात्र Z फोल्ड 4 मध्ये कोणतीही खाच नाही. हे सध्या उपलब्ध असलेल्या Galaxy S22 Ultra सारखेच आहे.
काही रिपोर्टच्या माध्यमातून सॅमसंगच्या या फोल्डेबल फोनचे काही फिचर्स उघड झाले होते. Galaxy Z Fold 4 अधिक चांगल्या कॅमेरासह येईल. डिव्हाइस 108MP मुख्य लेन्स, अल्ट्रा-वाइड लेन्स आणि शेवटी 3x ऑप्टिकल झूमसह टेलिफोटो कॅमेरासह येण्याची अपेक्षा आहे. ही झूमिंग क्षमता Z Fold 3 च्या 2x ऑप्टिकल झूमपेक्षा अपग्रेड असेल.
- या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1+ चिपसेटद्वारे दिला जाईल आणि यामध्ये 4440mAh बॅटरी असेल. याशिवाय या स्मार्टफोनला 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.
Web Title: Bill Gates Uses The Samsung Galaxy Z Fold 3 Smartphone Not Microsoft
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..