

Black Friday Scam:
Sakal
Black Friday 2025 online scam prevention tips: अलिकडच्या काळात ब्लॅक फ्रायडे सेल धुमाकुळ घालत आहे. प्रत्येक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या जात आहेत आणि लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. जर तुम्ही ब्लॅक फ्रायडे सेल बॅनरवर क्लिक करत असाल तर काळजी घेणे गरजेचे आहे. ClouSEK नावाच्या सायबरसुरक्षा कंपनीला असे आढळून आले आहे की Amazon, Samsung आणि Apple सारख्या कंपन्यांची नक्कल करणाऱ्या 2000 हून अधिक बनावट वेबसाइट ऑनलाइन तयार करण्यात आल्या आहेत. त्या ग्राहकांना ऑफर देऊन स्कॅमला बळी पाडतात आणि त्यांचा डेटा चोरतात.