Blaupunkt चा 40 इंच स्मार्ट टीव्ही लाँच: किंमत आहे खूप कमी!

Blaupunkt द्वारे नवीन 40 इंचाचा स्मार्ट टीव्ही लॉन्च
Blaupunkt
Blaupunktesakal

Blaupunkt : Blaupunkt द्वारे नवीन 40 इंचाचा स्मार्ट टीव्ही लॉन्च करण्यात आला आहे. या टीव्हीच्या किमतीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा नवीन सिग्मा सिरीजमध्ये 40 इंचाचा Android स्मार्ट टीव्ही आहे जो फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. टीव्ही खरेदीवर भारी डिस्काउंट ऑफरही दिली जात आहे.

Blaupunkt
KTM Bike : KTM ला हलक्यात घेऊ नका, रॉयल एन्फिल्डला टक्कर देण्यासाठी आणलीय प्रीमियम बाईक

किंमत आणि ऑफर

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Blaupunkt चा 40-इंच स्क्रीन आकाराचा स्मार्ट टीव्ही 13,499 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा टीव्ही फ्लिपकार्टवर विक्रीसाठी दिला जात आहे. फ्लिपकार्टचा बिग सेव्हिंग डेज सेल 5 मेपासून सुरू होत आहे.

Blaupunkt
Amazon Prime Video : 1 वर्षासाठी मोफत, नेटफ्लिक्सलाही या स्वस्त प्लॅनचा फायदा

परंतु अर्ली ऍक्सेस ऑफरमध्ये, तुम्ही 4 मे ते 10 मे दरम्यान टीव्ही खरेदी करू शकाल. टीव्ही खरेदीवर फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्के झटपट सूट दिली जात आहे. तर SBI कार्डवर 10 टक्के सूट दिली जात आहे. यानंतर टीव्हीची किंमत जवळपास 12 हजार रुपये होते.

Blaupunkt
Motorola Moto G : स्मार्टफोनचा बाप परत आला ! मोटोरोलाने लॉंच केले दोन नवीन स्मार्टफोन

कनेक्टिव्हिटी आणि इतर तपशील

Blaupunkt च्या ऑल न्यू सिग्मा सिरीजच्या 40-इंच Android स्मार्ट टीव्हीमध्ये दोन 40-वॉट स्पीकर आहेत, जे सराउंड साउंड टेक्नॉलजीसह येतात. या टीव्हीमध्ये 512 एमबी रॅम आणि 4 जीबी स्टोरेज आहे. हा बेझललेस स्मार्ट टीव्ही आहे. त्याच्या खालच्या बाजूस बॉटम फायरिंग बिल्ड-इन स्पीकर्स देण्यात आले आहेत.

Blaupunkt
SUV launch : यंदा बाजारात येणार तीन नव्या एसयूव्ही

तसेच 3 HDMI आणि 2 USB पोर्ट देण्यात आले आहेत. या टीव्हीमध्ये 300 निट्सची पीक ब्राइटनेस उपलब्ध आहे. टीव्ही लॅपटॉप, मोबाईल, पीसी सोबत जोडता येतो. यासोबतच Amazon Video, Zee5, Sony LIV आणि Voot सपोर्ट देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com