esakal | BSNLचा दमदार प्लॅन, मिळेल 2000GB डेटा, अनलिमीटेड कॉलिंगसह बरंच काही
sakal

बोलून बातमी शोधा

bsnl

BSNLचा दमदार प्लॅन, मिळेल 2000GB डेटा, अनलिमीटेड कॉलिंगसह बरंच काही

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने वापरकर्त्यांसाठी नवीन भारत फायबर FTTH ब्रॉडबँड प्लॅन घेऊन आली आहे. कंपनीच्या त्यांच्या या प्लॅनमध्ये 2000 जीबी पर्यंत डेटा मोफत कॉलिंगसह Zee 5, सोनी लिव्ह प्रीमियम सारख्या अनेक ओटीटी अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देण्यात येत आहे. कंपनीचा हा प्लॅन 749 आणि 949 रुपय किंमतीत देण्यात आले आहेत. कंपनीने अंदमान आणि निकोबार वगळता देशातील सर्व वापरकर्त्यांसाठी हे प्लॅन लॉन्च केले आहेत. हे प्लॅन 5 ऑक्टोबरपासून लाईव्ह झाले आहेत.

749 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन

कंपनीच्या या प्लॅनचे नाव सुपरस्टार प्रीमियम -1 प्लॅन असे आहे. या प्लॅनमध्ये कंपनी 100Mbps च्या स्पीडने 1000 GB डेटा देत आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर प्लॅनमध्ये उपलब्ध इंटरनेट स्पीड 5Mbps असेल. या प्लॅनमध्ये कंपनी देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित फ्री कॉलिंग ऑफर करत आहे.

949 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन

BSNL च्या या FTTH प्लॅनचे नाव सुपर स्टार प्रीमियम -2 असे आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 150Mbps इंटरनेट स्पीड तसेच कंपनी इंटरनेट वापरासाठी 2000GB डेटा देत आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर, प्लॅनमध्ये उपलब्ध इंटरनेट स्पीड 10Mbps पर्यंत कमी होते. या प्लॅनमध्ये तुम्हाला देशभरातील कोणत्याही नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग मिळेल.

हेही वाचा: रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५०चा विश्वविक्रम; लॉंच होताच गिनीज बुकात नोंद

कंपनी या दोन्ही प्लॅन्समघ्ये ग्राहकांना अनेक लोकप्रिय OTT अॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शनसाठी बेनिफीट्स देखील देत आहे. या प्लॅनमध्ये सोनी लिव्ह प्रीमियम, झी 5 प्रीमियम आणि VOOT Select चे फ्री सबस्क्रिप्शन देखील देण्यात येत आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये Yupp TVचा फ्री एक्सेस देखील दिला जात आहे. बीएसएनएलच्या या दोन्ही प्लॅनसाठी, वापरकर्त्यांना किमान एक महिन्याचे सेक्युरिटी डिपॉझिट भरावे लागेल याशिवाय या प्लॅनचे एक महिन्याचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.

हेही वाचा: ५ लाखांपेक्षा कमी किंमतीत या आहेत बेस्ट मायलेज देणाऱ्या कार

loading image
go to top