Mothers Day Recharge : मदर्स डे निमित्त 'या' बड्या कंपनीने आणली सुपर ऑफर! जास्त दिवसांच्या वैधतेसह 2 रीचार्ज प्लॅन्स लॉन्च

Mothers Day BSNL Recharge Plans Offers : मदर्स डेच्या निमित्ताने टेलीकॉम कंपनीने दोन रिचार्ज प्लॅन्सवर अतिरिक्त वैधतेची ऑफर जाहीर केली आहे. ही ऑफर फक्त १४ मेपर्यंत आणि अधिकृत वेबसाइटवर रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांसाठीच आहे
Mothers Day BSNL Recharge Plans Offers
Mothers Day BSNL Recharge Plans Offersesakal
Updated on

Mothers Day Recharge Plans : भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने (BSNL) आपल्या ग्राहकांसाठी मदर्स डे च्या निमित्ताने खास सवलतींची घोषणा केली आहे. या ऑफरअंतर्गत दोन प्रमुख प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सवर ग्राहकांना अतिरिक्त वैधता (validity) मिळणार आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असून, फक्त बीएसएनएलच्या अधिकृत वेबसाइटवरून रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांसाठी लागू आहे.

कोणते प्लॅन आहेत या ऑफरमध्ये?

  1. 1,999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
    यामध्ये नेहमी ३६५ दिवसांची वैधता असते, पण ऑफर अंतर्गत ३८० दिवसांची वैधता दिली जात आहे.
    फायदे: 600GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, आणि दररोज 100 SMS.

  2. 1,499 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
    पूर्वी ३३६ दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये आता ३६५ दिवसांची वैधता मिळेल.
    फायदे: 24GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, आणि दररोज 100 SMS.

Mothers Day BSNL Recharge Plans Offers
Edge 60 Pro : एकच झलक, सबसे अलग! मोटोरोलाचा स्मार्टफोन ‘Edge 60 Pro’ विक्रीसाठी उपलब्ध, दमदार फीचर्स अन् आकर्षक ऑफर्स, किंमत फक्त...
Mothers Day BSNL Recharge Plans Offers
Emergency Alerts : भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! धोकादायक परिस्थितीत तुमच्या मोबाईलवर मिळणार अलर्ट, पटकन सुरू करून घ्या ही 1 सेटिंग

ऑफरची कालमर्यादा

ही खास मदर्स डे ऑफर ७ मे ते १४ मे २०२५ पर्यंतच उपलब्ध आहे. या कालावधीदरम्यान बीएसएनएल वेबसाइटवरून रिचार्ज केल्यासच ही सुविधा लागू होईल.

ही ऑफर सुरू करताना बीएसएनएलने पुन्हा एकदा आपली ओळख स्वस्त आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून अधोरेखित केली आहे. खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत अधिक फायदेशीर सेवा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Mothers Day BSNL Recharge Plans Offers
Operation Sindoor Weapon : भारताने "ऑपरेशन सिंदूर"साठी वापरलेली प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम काय आहे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com