BSNL ची मोठी ऑफर, नवीन ग्राहकांना मिळणार फ्री डेटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BSNL

BSNL ची मोठी ऑफर, नवीन ग्राहकांना मिळणार फ्री डेटा

BSNL Offer : जेव्हा Airtel, Jio आणि Vodafone Idea सारख्या खाजगी कंपन्यांनी त्यांचे प्री-पेड प्लॅन महाग केले, तेव्हा सोशल मीडियावर लोकांकडून भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ला सपोर्ट मिळाला. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बीएसएनएलचे प्लॅन अजूनही खाजगी कंपन्यांपेक्षा स्वस्त ठेवले आहेत. या दरम्यान बीएसएनएल आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी ऑफर्स देत असते. आता कंपनीने आणखी एक शानदार ऑफर जाहीर केली आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊया...

नवीन ग्राहकांना मिळणार फ्री डेटा

BSNL ने म्हटले आहे की इतर कोणत्याही नेटवर्कवरून आपल्या नेटवर्कवर येणाऱ्या ग्राहकांना 5 GB डेटा फ्री मिळेल. या मोफत डेटाची वैधता 30 दिवसांची असेल. फ्री डेटासाठी एक अट अशी आहे की तुम्हाला सोशल मीडियावर बीएसएनएलच्या नेटवर्कमध्ये एमएनपी करण्याचे कारण द्यावे लागेल आणि कंपनीला त्याचा पुरावा पाठवावा लागेल.

हेही वाचा: Jio चा सगळ्यात स्वस्त प्लॅन, 400 पेक्षा कमीत 84 दिवस व्हॅलिडिटी

BSNL ची नवीन फ्री डेटा ऑफर 15 जानेवारी 2022 पर्यंत आहे. बीएसएनएलने ट्विट करून ही माहिती दिली आहे. MNP पूर्ण झाल्यानंतर, ग्राहकांना #SwitchToBSNL सह Twitter आणि Facebook वर पोस्ट करावे लागेल. यासोबतच बीएसएनएललाही टॅग करून फॉलो करावे लागेल.

सोशल मीडिया पोस्ट केल्यानंतर, फ्री डेटासाठी, ग्राहकांना त्यांच्या सोशल मीडिया पोस्टचा स्क्रीनशॉट ट्विटरवर किंवा व्हॉट्सअॅप नंबर-9457086024 वर डायरेक्ट मॅसेजमध्ये पाठवावा लागेल. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बीएसएनएलने 23,000 ग्राहक गमावले होते. कंपनीचा बाजार शेयर सध्या 9.73 टक्के आहे.

हेही वाचा: भारतात 1200 कोटींचा क्रिप्टो घोटाळा; शेकडो गुंतवणूकदारांना घातला गंडा

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BSNL
loading image
go to top