esakal | 20 हजारात खेरेदी करा 'हे' दमदार 5G स्मार्टफोन्स, पाहा फीचर्स
sakal

बोलून बातमी शोधा

budget-5g-phone-smartphone-under-rs-20000-in-india-see-list

20 हजारात खेरेदी करा 'हे' दमदार 5G स्मार्टफोन्स, पाहा फीचर्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सध्या प्रत्येकजण फास्ट फोन शोधत असतो कामाची वाढलेल्या स्पीडशी जुळवून घेण्यासाठी प्रत्येक जण आपल्याकडे चांगला फोन असावा अशी अपेक्षा ठेवतो त्यामुळेच आता बाजारात 5 जी कनेक्टिव्हिटी असलेले स्मार्टफोन लॉंच होत आहेत. दरम्यान भारतात अद्याप 5G लोकांपर्यंत पोहचले नाही तरी देखील, स्मार्टफोन ब्रँड आधीच हे तंत्रज्ञानाचे हे फोन देशात लॉंच करत आहेत. असे असले तरी 5G सपोर्ट असलेला स्मार्टफोन खरेदी करणे पूर्णपणे चूक ठरणार नाही कारण लवकरच भारतात देखील हा कनेक्टिव्हिटी पर्याय मिळू शकतो. दरम्यान जर तुम्ही 20,000 रुपयांखाली 5G फोन घेण्याचा विचार करत असाल तर आज आपण त्या किंतीत तुमच्यासाठी असलेले बेस्ट ऑप्शन जाणून घेणा आहोत.

Realme 8 5G (किंमत 14,499 रुपये)

जर तुम्ही 15,000 रुपयांखाली 5G स्मार्टफोन शोधत असाल तर तुम्ही Realme 8 5G या फोनचा विचार करु शकता. या फोनमध्ये 6.5-इंच फुल-एचडी + (1,080 × 2,400 पिक्सेल) डिस्प्ले दिला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 20: 9 आहे आणि रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज आहे. हुड मध्ये MediaTek डायमेंशन 700 SoC पॅक करतो आणि मागील बाजूस 48-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. 18W क्विक चार्ज फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000mAh ची बॅटरी देखील आहे.

Samsung Galaxy M32 5G ( किंमत 20,999 रुपये)

सॅमसंग गॅलेक्सी एम 32 5 जी 5G भारतात नुकताच दाखल झाला आहे आणि आयसीआयसीआय क्रेडिट कार्डद्वारे ग्राहकांना 2000 रुपयांची सूटसह 18,999 रुपये मिळू शकतो. सॅमसंग गॅलेक्सी M32 5G 6.5-इंच HD+ TFT इन्फिनिटी-व्ही डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटसह मिळतो. हुड मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंशन 720 SoC आहे, जो 8 जीबी रॅमसह जोडलेला आहे. त्याच्या क्वाड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला आहे आणि 5,000mAh ची बॅटरी आहे जी 15W चार्जिंगला सपोर्ट करते.

हेही वाचा: 1 नोव्हेंबरपासून 'या' स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्‌सअ‍ॅप होणार बंद

Redmi Note 10T 5G (किंमत 16,999 रुपये)

झिओमीचा सब-ब्रँड रेडमीने अलीकडेच प्रचंड लोकप्रिय नोट सीरीज अंतर्गत आपला पहिला 5G फोन लाँच केला. Redmi Note 10T 5G मध्ये 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 6.5-इंच फुल-एचडी+ स्क्रीन दिली आहे. MediaTek डायमेंशन 700 SoC आणि 48-megapixel प्रायमरी कॅमेरा दिला आहे. यात 5,000mAh ची बॅटरी आहे जी 18W चार्जिंगला सपोर्ट करते आणि बायोमेट्रिक सिक्युरिटीसाठी साइड माऊंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. ग्राहक तीन कलर व्हेरियंटमधून फोन निवडू शकतात.

Poco M3 Pro 5G (किंमत 15,999 रुपये)

Redmi Note 10T 5G आणि Poco M3 Pro 5G या दोन्हीमध्ये बरेच साम्य आहे, त्यामुळे ग्राहक चांगली ऑफर पाहून फोन निवडू शकतात. Poco M3 Pro 5G मध्ये 6.53-इंच फुल-एचडी+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. हे सारखेच डायमेंशन्स 700 SoC पॅक करते ज्यामध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 48-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. 18W फास्ट-चार्जिंग सपोर्टसह वापरकर्त्यांना 5,000mAh ची बॅटरी देखील मिळेल.

iQoo Z3 5G (किंमत 19,990 रुपये)

IQoo Z3 5G मध्ये 6.58-इंच फुल-एचडी+ एलसीडी डिस्प्ले दिला आहे आणि हुड खाली ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 768 जी एसओसी आहे जो इंटिग्रेटेड एड्रेनो 620 जीपीयूसह जोडलेला आहे. हे अँड्रॉइड 11-आधारित ओरिजिनओएस आउट-ऑफ-द-बॉक्स वर चालते आणि ड्युअल 5 जी सिम कार्डला सपोर्ट करते. त्याच्या ट्रिपल रिअर कॅमेरा सिस्टीममध्ये 64-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे.

हेही वाचा: महिंद्रा स्कॉर्पियो घ्यायचीय? मग हे आहे सर्वात स्वस्त मॉडेल

loading image
go to top