esakal | महिंद्रा स्कॉर्पियो घ्यायचीय? मग हे आहे सर्वात स्वस्त मॉडेल
sakal

बोलून बातमी शोधा

Mahindra Scorpio

महिंद्रा स्कॉर्पियो घ्यायचीय? मग हे आहे सर्वात स्वस्त मॉडेल

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

महिंद्रा स्कॉर्पियो (Mahindra Scorpio) एसयूव्ही गाडीचा भारतात एक वेगळा फॅनबेस आहे, त्यामागील कारण म्हणजे गाडीचे मजबूत इंजिन आणि त्यामध्ये देण्यात येणारे जबरदस्त फीचर्स हे आहे. ज्या फीचर्समुळेच स्कॉर्पियो ही एसयूव्ही (SUV) इतर कोणत्याही एसयूव्हीपेक्षा खूप वेगळी ठरते. या पावरफुल एसयूव्हीच्या टॉप मॉडेलच्या किंमतीबद्दल बोलयचे झाल्यात ती सुमारे 17 लाख रुपये आहे, ही किंमत बऱ्याच जणांना परवडणारी नाही. मात्र तुम्हाला स्कॉर्पियो विकत घ्यायची असेल आणि बजेट कमी पडत असेल, तर अशा वेळी तुम्ही स्कॉर्पियोचे बेस मॉडल खरेदी करु शकता. आज आपण स्कॉर्पियोच्या याच मॉडेल बद्दल जाणून घेणार आहोत जे फक्त तुमच्या खिशाला परवडणारेच नाही तर त्यात दमदार फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

हे आहे बेस मॉडेल

जर आपण महिंद्रा स्कॉर्पियोच्या बेस मॉडेलबद्दल बोललो तर हे S3+ हे व्हेरियंट उपलब्ध आहे. हे या एसयूव्हीचे सर्वात स्वस्त मॉडेल आहे जे तुम्ही 12,59,170 रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत खरेदी करू शकता. तुम्हाला जास्त फीचर्स असण्याची आवश्यकता नसेल तर हे मॉडेल तुमच्यासाठी बेस्ट ठरु शकते. तुम्ही हे खरेदी करु शकता.

हेही वाचा: 15 सप्टेंबरला लॉंच होणार Dizo Watch 2 आणि Dizo Watch Pro

महत्वाची वैशिष्टे

जर आपण महिंद्रा स्कॉर्पियो एस 3+च्या मुख्य फीचर्सबद्दल सांगायचे झाल्यास तर यामध्ये ग्राहकांना मॅन्युअल ट्रान्समिशन, डिझेल इंजिन, 43 सेमी मजबूत टायर्स, ड्युअल एअरबॅग, एलईडी टेल लॅम्प अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह दिले जातात.

इंजिन आणि पावर

इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, महिंद्रा स्कॉर्पियोचे बेस मॉडेल ग्राहकांना 2.2L 2179 cc शक्तिशाली डिझेल mHawk BSVI इंजिन देते. हे इंजिन 4000 आरपीएमवर 120 बीएचपीची पावर आणि 1800-2800 आरपीएमवर 280 एनएमचा पीक टॉर्क देते. हे इंजिन 5 आणि 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन ऑप्शन्ससह बाजारात उपलब्ध आहे ज्यातून ग्राहक त्यांच्या गरजेनुसार आणि पसंतीनुसार मॉडेल निवडू शकतात.

हेही वाचा: ALERT! एटीएम-क्रेडिट कार्डचा पासवर्ड करु नका सेव्ह, अन्यथा..

loading image
go to top