OnePlus 9r 5G स्मार्टफोन मिळतोय बंपर डिस्काऊंट, जाणून घ्या भन्नाट ऑफर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

OnePlus 9r 5G

OnePlus 9r 5G स्मार्टफोन मिळतोय बंपर डिस्काऊंट, पाहा डिटेल्स

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अॅमेझॉन इंडियावर सध्या स्मार्टफोन अपग्रेड डेज सेल सुरू असून 20 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्ही OnePlus 9R 5G हा स्मार्टफोन स्पेशल ऑफर आणि डिस्काउंटसह खरेदी करू शकता. 39,999 रुपये किंमत असलेल्या या फोनवर सेलमध्ये सध्या 3 हजार रुपयांचा कूपन डिस्काउंट दिला जात आहे, त्याच वेळी, तुम्ही सिटी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने खरेदी केल्यास, तुम्हाला 10 टक्के इंस्टंट डिस्काऊंट देखील मिळेल. हा फोन तुम्ही कूपन डिस्काउंट आणि बँक ऑफरसह 35,749 रुपयांना खरेदी करू शकता.

OnePlus 9R चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये कंपनीने 1080x2400 पिक्सेल रिझोल्युशनसह 6.5-इंचाचा फुल HD + OLED डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. कंपनीचा हा फोन 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह येतो. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये Snapdragon 870SoC चिपसेट देत आहे.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 16-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा 48-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 5-मेगापिक्सेल मॅक्रो शूटर आणि 2-मेगापिक्सेल मोनोक्रोम शूटर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळेल.

इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह या फोनमध्ये 4500mAh बॅटरी दिली आहे जी 65W वार्प चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी, तुम्हाला या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, ब्लूटूथ व्हर्जन 5.1, GPS/A-GPS, NFC आणि USB टाइप-सी पोर्ट देण्यात आले आहेत.

हेही वाचा: Tata Altroz ​​प्रीमियम हॅचबॅकचे नवीन व्हेरियंट भारतात लॉन्च

हेही वाचा: गुगलने बॅन केले 'हे' 7 Android अ‍ॅप्स; फोनमधून लगेच करा डिलीट

loading image
go to top