Smartphone Offer: Redmi च्या बेस्टसेलर फोनवर बंपर डिस्काउंट, १०४९ रुपयात करा खरेदी, इयरफोन्स फ्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Redmi 10 Power

Smartphone Offer: Redmi च्या बेस्टसेलर फोनवर बंपर डिस्काउंट, १०४९ रुपयात करा खरेदी, इयरफोन्स फ्री

Redmi 10 Power Details: लोकप्रिय ई-कॉमर्स साइट Amazon वर अनेक बेस्टसेलर स्मार्टफोन्स स्वस्तात उपलब्ध आहेत. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. Amazon वरून रेडमीच्या ५० मेगापिक्सल कॅमेरा आणि ६००० एमएएच बॅटरीसह येणाऱ्या फोनला १ हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.

Amazon वर Redmi 10 Power स्मार्टफोन स्वस्तात उपलब्ध आहे. या फोनची मूळ किंमत २० हजार रुपये आहे. परंतु, बंपर डिस्काउंटनंतर १०४९ रुपयात खरेदी करता येईल. विशेष म्हणजे फोन खरेदीवर ६९९ रुपये किंमतीचे PTron चे इयरफोन्स मोफत मिळतील.

हेही वाचा: Mahindra Thar: महिंद्राने लाँच केले Thar चे सर्वात स्वस्त व्हेरिएंट, फीचर्स एकापेक्षा एक जबरदस्त

Redmi 10 Power वर मिळेल बंपर ऑफर

Redmi 10 Power च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १८,९९९ रुपये आहे. ३२ टक्के डिस्काउंटनंतर हा फोन फक्त १२,४९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. ठराविक बँकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड्सचा वापर केल्यास ९७५ रुपये अतिरिक्त सूट मिळेल.

फोनवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. तुम्ही जुना फोन दिल्यास ११,९५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. मात्र, ही ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या लेटेस्ट मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास फोनला १ हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करता येईल.

हेही वाचा: Digi Yatra: विमानतळावरच्या वेटिंगने चिडचिड होते? सरकारचं App ठरणार तारणहार

Redmi 10 Power चे स्पेसिफिकेशन्स

Redmi 10 Power मध्ये ६.७ इंच HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला असून, सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ चा सपोर्ट मिळेल. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरसह ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी UFS २.२ स्टोरेज दिले आहे. तर स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबीपर्यंत वाढवू शकता.

रेडमीच्या या फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी ५० मेगापिक्सल प्रायमरी सेंसरसह २ मेगापिक्सल पोर्ट्रेट सेंसर मिळेल. तर सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. यात पॉवर बॅकअपसाठी १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल.

हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

टॅग्स :phoneMobile Phone