Bumper Offer : काय सांगताय? फक्त 699 रुपयांत मिळतोय 5G Smartphone! खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bumper Offer

Bumper Offer : काय सांगताय? फक्त 699 रुपयांत मिळतोय 5G Smartphone! खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

Bumper Offer : फ्लिपकार्टचा बिग सेव्हिंग डेज सेल संपला असला तरी आता मोटो डेज सेल सुरू झाला आहे, ज्याचा आज शेवटचा दिवस आहे. सेल दरम्यान मोटोरोला स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. सेलमध्ये 5G फोनवरही मोठ्या सवलती उपलब्ध आहेत. Motorola चा सर्वात जबरदस्त 5G फोन फक्त Rs.699 मध्ये खरेदी केला जाऊ शकतो. आश्चर्याची बाब म्हणजे यामध्ये बँक ऑफरचा समावेश नाही. ट्रेड इनच्या मदतीने फोन स्वस्तात खरेदी करता येतो. कसे ते जाणून घेऊया.

MOTOROLA G62 5G (128 GB) ची लॉन्चिंग किंमत 21,999 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्टवर 14,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच फोनवर 31 टक्के सूट दिली जात आहे. फोनवर एक उत्तम एक्सचेंज ऑफर आहे, ज्यामुळे फोनची किंमत आणखी कमी होईल.

MOTOROLA G62 5G वर 14,300 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन बदललात तर तुम्हाला इतकी सूट मिळेल. परंतु 14,300 रुपयांचे एक्सचेंज तेव्हाच मिळेल जेव्हा तुमच्या जुन्या फोनची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल नवीनतम असेल. तुम्ही पूर्ण ऑफर मिळवण्यात यशस्वी झाल्यास फोनची किंमत 699 रुपये असेल.

हेही वाचा: iPhone 15 Pro Max : आयफोन प्रेमींसाठी खुशखबर, लाँच होण्याआधीच लूक व्हायरल, पाहा एका क्लिकवर

जर तुम्हाला फोन एक्सचेंज करायचा नसेल तर बँक ऑफर देखील आहे. फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही फेडरल बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरल्यास तुम्हाला 750 रुपयांची सूट मिळेल. म्हणजेच पूर्ण 10 टक्के ऑफर दिली जात आहे. त्यानंतर किंमत 14,249 रुपये असेल.