६ हजार द्या अन् घरी घेऊन जा नवीकोरी अ‍ॅक्टिव्हा, जाणून घ्या ऑफर | Honda Activa Offer | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Honda Scooter

Honda Activa Offer: ६ हजार द्या अन् घरी घेऊन जा नवीकोरी अ‍ॅक्टिव्हा, जाणून घ्या ऑफर

Offer On Honda Activa 6G Premium Edition: २०२३ हे वर्ष नवीन स्कूटरसह साजरे करण्याची संधी आहे. तुम्ही खूपच कमी किंमतीत लोकप्रिय होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटरला घरी घेऊन जाऊ शकता. होंडा अ‍ॅक्टिव्हा भारतातील सर्वात लोकप्रिय स्कूटरपैकी एक आहे. होंडा अ‍ॅक्टिव्हा 6जी चे (Honda Activa 6G) बाजारात तीन व्हेरिएंट उपलब्ध आहेत. याच्या प्रीमियम एडिशनवर आकर्षक ऑफर उपलब्ध आहे. तुम्ही ईएमआयवर या स्कूटरला खरेदी करू शकता. होंडाच्या या स्कूटरवरील ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा- Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

Honda Activa 6G Premium Edition ची किंमत

Honda Activa 6G Premium Edition ची किंमत ७६,५८७ रुपये (एक्स शोरुम) आहे. तर स्कूटरची ऑन रोड किंमत ८८,८८८ रुपये आहे. जर तुम्ही रोख रक्कम देऊन स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जवळपास ९० हजार रुपये खर्च करावे लागतील. मात्र, तुम्ही फक्त ६ हजार रुपये डाउन पेमेंट देऊन ईएमआयवर स्कूटरला खरेदी करू शकता.

६ हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर स्कूटर खरेदी केल्यास बँकेकडून तुम्हाला ८२,८८८ रुपयांपर्यंत कर्ज मिळेल. कर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला ६ हजार रुपये डाउन पेमेंट द्यावे लागेल. यानंतर तुम्हाला दर महिन्याला फक्त २,६६३ रुपये ईएमआय भरावी लागेल. ईएमआय ३६ महिने भरावी लागेल.

हेही वाचा: Mobile App: आता घरबसल्या पाहता येईल न्यायालयाचे कामकाज, सुप्रीम कोर्टाने लाँच केले नवीन अ‍ॅप

Honda Activa 6G Premium Edition चे इंजिन

Honda Activa 6G Premium Edition मध्ये कंपनीने १०९.५१ सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन ७.७९ पीएस पॉवर आणि ८.८४ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. माइलेजमध्ये देखील ही स्कूटर जबरदस्त आहे. Honda Activa प्रती लीटर ६० किमी माइलेज देते. दरम्यान, तुम्ही जर नवीन वर्षात स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Honda Activa 6G Premium Edition एक चांगला पर्याय आहे.

टॅग्स :Automobilescooter