सरकारचा मोठा निर्णय, आता सर्व स्मार्टफोनसाठी एकच चार्जर; आदेश जारी | Phone Charger | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Phone charger

Phone Charger: सरकारचा मोठा निर्णय, आता सर्व स्मार्टफोनसाठी एकच चार्जर; आदेश जारी

USB Type-C charger soon to be mandatory: अँड्राइड, आयओएस फोनसाठी वेगवेगळे चार्जर वापरावा लागतो. यामुळे अनेक यूजर्सला अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतात. मात्र, आता भारत सरकारने यूजर्सच्या फायद्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक कचरा कमी करण्यासाठी मोबाइल चार्जरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सर्व प्रकारच्या स्मार्टफोनसाठी एकाच प्रकारच्या यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्टचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे.

भारतीय मानक ब्यूरोने (BIS) ने यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्टसाठी स्टँडर्ड्स जारी केले आहेत. कंझ्यूमर अफेअर्स सेक्रेटरी रोहित कुमार सिंह यांनी माहिती दिली की, स्मार्टफोन, टॅबलेट आणि लॅपटॉपच्या चार्जिंग पोर्टसाठी यूएसबी टाइप-सी चा वापर करण्यासाठी कंपन्यांनी सहमती दर्शवली आहे. डिसेंबर २०२४ पासून हे नियम लागू होतील.

हेही वाचा: Auto Expo India 2023: ऑटोमोबाइल क्षेत्रातील सर्वात मोठा इव्हेंट, न्यू कार लाँचिंगसह बरंच काही; पाहा संपूर्ण डिटेल्स

यूरोपियन संसदेने केला आहे कायदा

यूरोपियन संसदेने याआधीच एक प्रस्ताव पारित केला आहे. यानुसार वर्ष २०२४ च्या अखेरपर्यंत सर्व इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या आयफोन आणि एअरपॉड्ससह इतर डिव्हाइससाठी चार्जिंग पोर्ट म्हणून यूएसबी टाइप-सी चा वापर करतील. वर्ष २०२६ पासून हे नियम लॅपटॉपसाठी देखील लागू होतील.

हेही वाचा: जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

नवीन नियमांनुसार यूजर्सला नवनवीन डिव्हाइस खरेदी केल्यावर वेगळ्या चार्जरची गरज नाही. कारण लहान व मध्यम आकाराच्या पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइससाठी एकच चार्जरचा उपयोग करता येईल. सर्व नवीन मोबाइल फोन, टॅबलेट, डिजिटल कॅमेरा, हेडफोन आणि हेडसेट, हँडहेल्ड व्हीडिओ-गेम, कंसोल आणि लॅपटॉपला एकाच वायर्ड केबलद्वारे चार्जर करता येईल. या चार्जिंग केबल १०० वॉटपर्यंत पॉवर डिलिव्हरी करू शकतात.

फास्ट चार्जिंग सपोर्ट करणाऱ्या सर्व डिव्हाइसमध्ये आता चार्जिंग स्पीड समान असेल. यामुळे यूजर्सला कोणत्याही चार्जरद्वारे फोन चार्ज करता येईल.

हेही वाचा: Smartphone Buying Guide: नवीन फोन खरेदी करताय? 'या' गोष्टी नक्की पाहा, अन्यथा होईल मोठे नुकसान

टॅग्स :mobilephoneMobile Phone