ऑटोमोबाइल क्षेत्रातील सर्वात मोठा इव्हेंट, न्यू कार लाँचिंगसह बरंच काही; पाहा संपूर्ण डिटेल्स | Auto Expo India 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Auto Expo India 2023

Auto Expo India 2023: ऑटोमोबाइल क्षेत्रातील सर्वात मोठा इव्हेंट, न्यू कार लाँचिंगसह बरंच काही; पाहा संपूर्ण डिटेल्स

Auto Expo India 2023: ऑटोमोबाइल क्षेत्रातील सर्वात मोठा इव्हेंट लवकरच भारतात होणार आहे. दर दोन वर्षांनी आयोजित केल्या जाणाऱ्या ऑटो एक्स्पो इव्हेंटचे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्यूफॅक्चरर्सद्वारे करण्यात आले आहे. या इव्हेंटमध्ये नवीन कार, बाईक, स्कूटर, कॉन्सेप्ट व्हीकल, कमर्शियल व्हीकल आणि नवीन मोटर व्हीकल टेक्नोलॉजीला सादर केले जाईल.

कोरोनामुळे २०२२ चा इव्हेंट रद्द करण्यात आला होता. आता याचे आयोजन वर्ष २०२३ मध्ये करण्यात आले आहे. हा ऑटो एक्स्पो इव्हेंट कधी व कोठे पार पडणार आहे? त्याविषयी जाणून घेऊया.

हेही वाचा: Smartphone Buying Guide: नवीन फोन खरेदी करताय? 'या' गोष्टी नक्की पाहा, अन्यथा होईल मोठे नुकसान

कोठे होणार ऑटो एक्सपो 2023?

ऑटो एक्सपो 2023 इव्हेंटला (Auto Expo 2023) इंडिया एक्स्पो मार्टमध्ये आयोजित केले जाईल. इंडिया एक्स्पो मार्ट उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथील जेपी गोल्फ कोर्स येथे आहे. यासोबतच, दिल्लीच्या प्रगती मैदानात ऑटो एक्स्पो-कंपोनेंट शोचे आयोजन केले जाईल.

कधी होणार ऑटो एक्सपो 2023?

Auto Expo 2023 चे १३ ते १८ जानेवारीपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. १४ आणि १५ जानेवारीला सकाळी १ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत, १५ आणि १७ जानेवारीला सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत आणि १८ जानेवारीला सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत इव्हेंटचे आयोजन केले जाईल. इव्हेंटमध्ये प्रवेशासाठी देखील ठराविक वेळ असेल.

हेही वाचा: जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

ऑटो एक्सपोमध्ये कसे पोहचाल?

इंडिया एक्स्पो मार्ट दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि एनसीआरपासून जवळ आहे. तुम्ही रस्त्याने आणि मेट्रोद्वारे देखील येथे पोहचू शकता. तसेच, ८ लेन नोएडा एक्स्प्रेसवेद्वारे नवीन दिल्ली रेल्वे स्टेशन आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देखील पोहचता येईल. इव्हेंटच्या ठिकाणी ८ हजार गाड्या देखील सहज पार्क करता येतील.

या कंपन्या इव्हेंटमध्ये होणार सहभागी

ऑटो एक्सपो 2023 वेगवेगळ्या कंपन्यांच्या कार्स आणि दुचाकी सादर होतील. Maruti Suzuki, Hyundai, Tata Motors, Mahindra, Toyota, Kia, MG, Renault आणि Nissan सारख्या प्रमुख कंपन्या इव्हेंटमध्ये शानदार कॉन्सेप्ट कारला सादर करतील. याशिवाय, मर्सिडीज बेंझ, जॅगुआर लँड रोव्हर आणि बीएनड्ब्ल्यू सारख्या कंपन्यांच्या लग्झरी कार्स देखील यावेळी सादर होतील.

हेही वाचा: Kinetic Luna: जुन्या आठवणी होणार ताज्या! ५० वर्षांनंतर नवीन अवतारात येणार 'ही' लोकप्रिय गाडी