थर्मामीटर पेक्षा स्वस्त शरीरातील ताप मोजणारा फोन, हे आहेत फीचर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

itel it2192T Thermo Edition

थर्मामीटर पेक्षा स्वस्त शरीरातील ताप मोजणारा फोन, हे आहेत फीचर्स

स्मार्टफोन बनवणारी कंपनी itel ने भारताचा पहिला फीचर फोन बाजारात आणला होता, जो बिल्ट इन-टेम्परेचर सेन्सरसह येतो. itel it2192T Thermo Edition मदतीने तुम्ही तुमच्या शरीतील ताप मोजू शकाल आणि या फोनची किंमत डिजिटल इन्फ्रारेड थर्मामीटरपेक्षा कमी आहे. itel it2192T Thermo Edition ची किंमत 1049 रुपये आहे. तर Vandelay डिजिटल इन्फ्रारेड थर्मामीटर 1799 रुपयांना येते. हा itelचा एंट्री लेव्हल फीचर फोन आहे, ज्याच्या मदतीने कोरोनाच्या काळात ताप मोजू शकाल.

काय आहेत स्पेसिफिकेशन्स

itel it2192T Thermo Edition हा फोन इन-बिल्ड तापमान सेन्सरसह येतो. याच्या मदतीने ग्राहक शरीराचे तापमान मोजू शकतात. तसेच या फोनमध्ये टेक्स्ट टू स्पीच फीचर देण्यात आले आहे. म्हणजे तुम्ही बोलून टाइप करु शकता. हा फोन इंग्रजी, हिंदी, पंजाबी, बंगाली, तेलगू, कन्नड आणि गुजराती या 8 भारतीय भाषांना सपोर्ट देतो. या फोनमध्ये थर्मो सेन्सर हा कॅमेर्‍याच्या बाजूला ठेवला आहे. हे फीचर वापरण्यासाठी वापरकर्त्यास बर्‍याच काळासाठी फोनचे थर्मो बटन दाबावे लागेल. तसेच, हाताचा तळवा किंवा बोट सेन्सरवर ठेवावे लागेल. यानंतर, फोन शरीराच्या तपमानाबद्दल माहिती देईल. सेल्सिअस आणि फॉरेन हाइटमध्ये हे तापमान मोजले जाऊ शकते. तपमान देखरेखीशिवाय itel it2192T Thermo Edition फोनच्या मदतीने कॉलिंग आणि मेसेजिंग देखील करता येते.

फोनची बॅटरी चार दिवस चालेल

itel it2192T Thermo Edition ला 1000mAh ची मोठी बॅटरी मिळेल. कंपनीच्या दाव्यानुसार फोन एका चार्जमध्ये 4 दिवस आरामात वापरता येतो. फोनमध्ये 4.5 सेमी डिसप्ले आहे. या कीपॅड फोनच्या मागील बाजूस एक कॅमेरा देण्यात आला आहे. फोन वायरलेस एफएम रेकॉर्डिंग, ऑटो कॉल रेकॉर्डर, एलईडी फ्लॅशलाइट, टच म्यूट आणि प्री-लोड गेम्ससह येईल.

हेही वाचा: तुमचा स्मार्टफोन स्लो झालाय का? मग हे उपाय नक्की करून बघा

Web Title: Buy A Fever Measuring Itel It2192t Termo Edition Phone At A Lower Price Than

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Technology
go to top