Fridge in Monsoon : पावसाळ्यात थोडा वेळ फ्रीज बंद ठेऊ शकतो का? वीज बिलावर होतो 'असा' परिणाम..

Fridge Turn off in Rainy Season Effect : पावसाळ्यात फ्रीज बंद ठेवावा का? यामुळे वीजेची बचत होते का, जाणून घ्या.
Fridge Turn off in Rainy Season Effect
Fridge Turn off in Rainy Season Effectesakal
Updated on

Monsoon Tips : पावसाळ्याच्या दिवसांत हवामानात गारवा वाढतो आणि तापमान तुलनेने कमी असते. त्यामुळे काही नागरिक ‘फ्रीज काही वेळ बंद ठेवावा का?’ असा प्रश्न विचारतात. जर आपण फ्रीज बंद ठेवला तर वीज बिलावर आणि त्यात ठेवलेल्या अन्नपदार्थावर काय परिणाम होतो जाणून घेऊया

फ्रीज हा घरातील सर्वाधिक सतत चालणारा विद्युत उपकरणांपैकी एक आहे. त्यामुळे तो बंद ठेवल्यास वीजेची बचत होणे शक्य आहे. विशेषतः पावसाळ्यात हवा थंड असल्यामुळे फ्रीजचा वापर काही अंशी टाळता येतो. उदाहरणार्थ, जर घरी राहणाऱ्यांची संख्या कमी असेल किंवा दररोज ताजे अन्न तयार होत असेल, तर काही दिवस फ्रीज बंद ठेवणे शक्य होऊ शकते. यामुळे वीज बिलात थोडीफार घट होऊ शकते.

Fridge Turn off in Rainy Season Effect
Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये झाली आणखी एका नव्या फीचरची एन्ट्री; पाहा एका क्लिकवर..

मात्र, फ्रीज बंद ठेवण्याआधी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, फ्रीजमधील अन्नपदार्थ बाहेर काढून त्यांचे योग्य साठवण करणे गरजेचे आहे. अन्यथा अन्न खराब होण्याची शक्यता असते. तसेच वारंवार फ्रीज सुरू-बस केल्यास उपकरणावर ताण येतो आणि विद्युत खपत वाढू शकते. त्यामुळे फ्रीज पूर्णपणे बंद ठेवण्यापेक्षा त्याचा वापर मर्यादित करणे अधिक योग्य ठरते.

Fridge Turn off in Rainy Season Effect
Galaxy M36 5G Mobile : खुशखबर! सॅमसंगने लॉन्च केला Galaxy M36 5G मोबाईल; परवडणारी किंमत अन् दमदार फीचर्स एकदा बघाच..

थोडक्यात, पावसाळ्यात फ्रीज काही दिवस बंद ठेवल्यास वीजेची थोडी बचत होऊ शकते. मात्र, यासाठी योग्य नियोजन गरजेचे आहे. अन्न साठवणूक आणि फ्रीजच्या देखभालीचा विचार करूनच असा निर्णय घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com