जुन्या गाड्यांमध्ये टाकता येईल का E20 इंधन? काय होईल परिणाम? जाणून घ्या

E20 इंधनामध्ये 20 टक्के इथेनॉलचा वापर करण्यात आलेला असतो.
can we use E20 fuel for old vehicles?
can we use E20 fuel for old vehicles?Esakal

E20 fuel for old vehicles: देशातील प्रदुषणावर आळा घालण्यासाठी देशात BS6 फेज-2 इंजिनचे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे ऑटोमोबाईल कंपन्यांनी आपल्या उत्पादनांमधील इंजिन त्यानुसार अपडेट करून घेतले आहेत. या नियमानुसार, देशातील सर्व गाड्यांमधील पॉवरट्रेन आता E20 इंधनावर चालतील.

नवीन गाड्यांमध्ये तर E20 इंधनाला सूट होणारे इंजिन असेल. मात्र, ज्यांच्याकडे जुन्या गाड्या आहेत, त्यांनी हे इंधन वापरावे का याबाबत अजूनही लोकांच्या मनात संभ्रम आहे. E20 इंधनाचा तुमच्या जुन्या गाडीवर काय परिणाम होईल, याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

can we use E20 fuel for old vehicles?
Price Hike On Cars : BS6 फेज-2 मुळे वाहनांच्या किंमतीत होणार वाढ, आता एवढे पैसे जास्त मोजावे लागतील

इथेनॉलचा वापर

E20 इंधनामध्ये 20 टक्के इथेनॉलचा वापर करण्यात आलेला असतो. म्हणजे, एक लीटर पेट्रोल किंवा डिझेलमध्ये 200 ml इथेनॉल असणार आहे. गाड्यांमधून होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी या इंधनाचा वापर केला जातो.

सामान्य पेट्रोल किंवा डिझेलच्या तुलनेत, E20 इंधनातून कमी प्रमाणात कार्बन मोनॉक्साईडचे उत्सर्जन होते. यासोबतच, इथेनॉलचे देशातच उत्पादन होत असल्यामुळे भारताला आत्मनिर्भर होण्यासाठीही चालना मिळते.

can we use E20 fuel for old vehicles?
Car Tips : अचानक ब्रेक फेल झाल्यावर काय कराल? या टिप्स वाचवतील तुमचा जीव

जुन्या गाड्यांवर काय परिणाम?

BS6 फेज-2 पॉवरट्रेन नसणाऱ्या जुन्या गाड्यांमध्येही तुम्ही E20 हे इंधन वापरू शकणार आहात. मात्र, याचा परिणाम गाडीच्या परफॉर्मन्सवर होणार आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यामुळे गाडीचे मायलेज 7 टक्क्यांनी कमी होऊ शकतं. यासोबतच, इंधनात असलेल्या इथेनॉलमुळे इंजिनचे पार्टही लवकर खराब होऊ शकतात.

can we use E20 fuel for old vehicles?
Used Cars : देशात सेकंड-हँड गाड्यांचं मार्केट डाऊन, नवीन गाड्यांची होतेय जबरदस्त विक्री! जाणून घ्या कारण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com