Car Tips for Holi : रंग खेळताना कारची घ्या विशेष काळजी; नुकसान टाळण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Holi Colors : आपण रंग खेळण्यासाठी साधे कलर्स आणले, तरी इतरांनी कशा प्रकारचे रंग आणले असतील हे सांगता येत नाही. कित्येक वेळा पक्के रंग किंवा चिनी सिल्व्हर कलर वापरल्यामुळे गाडीला नुकसान होऊ शकतं.
Car Tips for Holi
Car Tips for HolieSakal

Car Safety Tips : देशातील प्रमुख सणांपैकी एक म्हणजे होळी. उत्तर भारताप्रमाणेच आता महाराष्ट्रात देखील बऱ्याच ठिकाणी होळीच्या दिवशी रंग खेळण्याचा आनंद लोक घेतात. सोबतच रंगपंचमी दिवशी देखील मोठ्या प्रमाणात रंग खेळला जातो. रंग खेळताना बऱ्याच वेळा बाजूला असलेल्या तुमच्या कारचं देखील नुकसान होऊ शकतं. यामुळे काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे.

आपण रंग खेळण्यासाठी साधे कलर्स आणले, तरी इतरांनी कशा प्रकारचे रंग आणले असतील हे सांगता येत नाही. कित्येक वेळा पक्के रंग किंवा चिनी सिल्व्हर कलर वापरल्यामुळे गाडीला नुकसान होऊ शकतं. गाडीच्या बाहेरील भागात लागलेला रंग कदाचित आरामात निघेलही, मात्र आतमध्ये रंग गेल्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं.

कार ठेवा झाकून

रंग खेळताना गाडीला नुकसान होऊ नये यासाठीचा सर्वात सोपा उपाय म्हणजे, आपली कार झाकून ठेवणं. कारसोबत कंपनीने दिलेला कव्हर किंवा तुम्ही घेतलेला चांगला कव्हर वापरणं कधीही उत्तम. यामुळे कारवर रंग उडून तिचं नुकसान होत नाही. कार पूर्णपणे झाकली जाईल याची काळजी नक्की घ्या.

Car Tips for Holi
Car Theft : चोरांची फेव्हरेट आहे 'ही' गाडी.. यावर्षी सर्वाधिक चोरी झालेल्या कार्सच्या यादीत मिळवलं पहिलं स्थान!

कार वॅक्स

जर तुम्हाला कार बाहेर काढणं गरजेचं असेल, तर आधी त्यावर कार वॅक्स लाऊन घ्या. कार चांगल्या प्रकारे धुवून त्यावर वॅक्स किंवा पॉलिश लावल्यास त्यावर रंग टिकणार नाही. यामुळे तुमच्या गाडीचा रंगही सुरक्षित राहील.

इंटेरियरची सुरक्षा

कारच्या आतमध्ये रंग गेल्यास भरपूर मनस्ताप आणि खर्च होण्याची शक्यता आहे. यामुळेच कारच्या सीट्स, स्टिअरिंग व्हील, डोअर नॉब, कंट्रोल पॅनल, हेडरेस्ट आणि बॅकरेस्ट अशा सर्व गोष्टींना प्लास्टिक कव्हर लावल्याने फायदा होऊ शकतो. तुमची कार पार्किंगमध्ये असेल तर तिच्या काचा लावलेल्या आहेत का हे तपासणंही गरजेचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com