Car Tips : गाडीच्या सायलेन्सरपर्यंत पाणी आलं तर काय कराल? लाखोंच्या नुकसानापासून वाचवेल एक साधी आयडिया

तुमच्या गाडीतून बाहेर पडणं तुमच्यासाठी मोठं संकट ठरू शकतं
Car Tips
Car Tips esakal
Updated on

Car Tips : सध्या पावसाने कहर केलाय. अनेक भाग पुराच्या विळख्यात आलेत. अनेक भागात पाणी तुंबले आहे. अशा परिस्थितीत तुमच्या गाडीतून बाहेर पडणं तुमच्यासाठी मोठं संकट ठरू शकतं. शिवाय लाखोंच नुकसान होतं ते वेगळंच. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जर तुमची कार सायलेन्सरपर्यंत पाण्यात बुडली तर तुम्ही काय करायला पाहिजे. काही ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही तुमचे लाखो रुपये वाचवू शकता.

सायलेन्सरमध्ये पाणी शिरल्याने होतं मोठं नुकसान

गाडी पाण्यात बुडली तर त्याच्या इंजिनमध्ये पाणी शिरण्याची भीती असते आणि चुकून त्यात पाणी शिरले तर लाखोंचे नुकसान होऊ शकते. यामुळे कारच्या इलेक्ट्रिकल पार्टसचे नुकसान होते. अशा स्थितीत काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

Car Tips
Kareena's Health Tips : हेल्दी राहण्यासाठी बेबो रोज रात्री न विसरता हा पदार्थ टाकून पिते दूध

कार सुरू करू नका

जर तुमची गाडी सायलेन्सरपर्यंत पाण्यात गेली असेल, तर अशा स्थितीत गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करू नका. अशा स्थितीत इंजिनमध्ये पाणी जाण्याचा धोका जास्त असतो कारण कार सुरू केल्यास इंजिन पूर्णपणे खराब होऊ शकते. इंजिन तपासण्यासाठी, डिपस्टिक काढा आणि इंजिनमध्ये पाणी पोहोचले आहे की नाही ते पाहा. डिपस्टिकमध्ये पाण्याचे एक-दोन थेंब जरी दिसले तर समजा की इंजिनमध्ये पाणी शिरले आहे.

Car Tips
Mobile Charging Tips : केवळ फोनच नाही, तर चार्जरमध्येही लागू शकते आग; अशी घ्या खबरदारी!

या ट्रिक्स वापरा

तुमच्या कारची बॅटरी डिस्कनेक्ट करा, यामुळे कारच्या इलेक्ट्रिकल पार्टस आणि तारांमध्ये पाणी जाण्यापासून प्रतिबंध होईल. असं केलं नाही तर गाडीच्या वायरमध्ये पाणी शिरते आणि शॉर्ट सर्किट होण्याचा धोका असतो.

Car Tips
Weight Gain Tips:  लुकड्या शरीरावरून लोकांनी टोमणे मारून हैराण केलंय? हे सुपरफूड बनवतील तुम्हाला सुदृढ!

कारमधून पाणी काढून टाकण्यासाठी, तुम्हाला तुमची कार कोरड्या आणि सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे. यानंतर, कारचे दरवाजे उघडा आणि काही तास उन्हात वाळवा, यामुळे कारमधील सर्व पाणी कोरडे होईल.

Car Tips
Black Hair Tips: खोबरेल तेलात टाकून लावा या 2 गोष्टी, पांढरे केस काही दिवसातच होतील काळे!

कारचे इंजिन ऑईल आणि कूलंट बदला कारण जेव्हा पाणी इंजिनमध्ये जाते तेव्हा ते इंजिन ऑईल आणि कूलंटमध्ये मिसळते. यामुळे इंजिन ऑइल आणि कूलंट दोन्ही खराब होतात. अशा परिस्थितीत, कार सुरू करण्यापूर्वी आपण इंजिन ऑईल आणि कूलंट बदलणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.