विजेशिवाय महिनाभर चालतो 'हा' हटके ५५ इंच स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या किंमत-फीचर्स | CES 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

TV

CES 2023: विजेशिवाय महिनाभर चालतो 'हा' हटके ५५ इंच स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या किंमत-फीचर्स

CES 2023 Details: जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक इव्हेंट CES 2023 सुरू झाला आहे. दरवर्षी आयोजित होणाऱ्या या इलेक्ट्रॉनिक इव्हेंटमध्ये अनेक शानदार डिव्हाइस आणि प्रोडक्ट्स लाँच केले जातात. या इव्हेंटमध्ये आता ५५ इंचाचा एक हटके टीव्ही सादर करण्यात आला आहे. हा एक वायरलेस टीव्ही असून, जो विजेशिवाय चालतो.

रिपोर्टनुसार, हा एक बॅटरी पॉवर्स स्मार्ट टीव्ही असून, यात ३० दिवसांची बॅटरी लाईफ मिळेल. ज्या भागांमध्ये विजेची समस्या असते, अशा ठिकाणी हा टीव्ही खूपच उपयोगी ठरेल.

हेही वाचा: Flying Bike: आता हवेतही होणार धूम धूम, फ्लाइंग बाईकचे बुकिंग सुरू; किंमत तब्बल...

या टीव्हीमध्ये काय आहे खास?

विजेशिवाय चालणारा हा ५५ इंच स्मार्ट टीव्ही ४के रिझॉल्यूशन सपोर्टसह येतो. यात हॉट स्वॅपेबल बॅटरी मिळते. लॅपटॉप्रमाणेच टीव्हीच्या मागील बाजूला बॅटरी देण्यात आली आहे. एकदा बॅटरी डिस्चार्ज झाल्यास तुम्ही पुन्हा काढून चार्ज करू शकता.

स्मार्ट टीव्ही अ‍ॅक्टिव्ह लूप वॅक्यूम सिस्टमसह येतो. या टीव्हीचा सरफेस खूपच पातळ असून, वॉल माउंट करताना कोणतीही समस्या येत नाही. यामध्ये कोणतेही कनेक्टर देण्यात आलेले नाही. परंतु, एक रेक्टेबल कॅमेरा सेटअप मिळतो. जेस्जर कंट्रोलच्या मदतीने सहज टीव्ही पाहू शकता. यासाठी कोणत्याही रिमोटची गरज नाही. टच कंट्रोल आणि वॉइस इनपुटच्या मदतीने टीव्ही पाहताना एक शानदार अनुभव मिळेल. कंपनी अ‍ॅप रिमोट कंट्रोलची देखील सुविधा देते.

हेही वाचा: Flipkart Sale: धमाकेदार ऑफर! जुना फोन द्या अन् नवीन घेऊन जा, फक्त ८०० रुपये करा खर्च

कोणत्या वायर कनेक्टिव्हिटीशिवाय या टीव्हीचा वापर करता येईल. या टीव्हीचे वैशिष्ट्ये म्हणजे ४ टीव्हीला एकाचवेळी कंट्रोल करून २२० इंच स्मार्ट टीव्ही बनवू शकता. किंमतीबद्दल सांगायचे तर या हटके स्मार्ट टीव्हीसाठी तुम्हाला २,४८,३१९ रुपये खर्च करावे लागतील. पुढील काही महिन्यात टीव्हीची विक्री सुरू होऊ शकते.

हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

टॅग्स :tvLED TV