ChatGPT Hack : धक्कादायक! चॅटजीपीटी वापरणाऱ्या एक लाख लोकांचा डेटा हॅक; सर्वाधिक यूजर्स भारतातील - रिपोर्ट

ग्रुप-आयबी नावाच्या एका सायबर टेक्नॉलॉजी कंपनीने याबाबत माहिती दिली आहे.
ChatGPT Data Hack
ChatGPT Data HackeSakal

गेल्या वर्षी लाँच झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच चॅटजीपीटी हे एआय सॉफ्टवेअर जगभरात प्रसिद्ध झाले आहे. यामुळे कित्येक लोकांची कामं सोपी झाली आहेत, तर कित्येकांना आपली नोकरीही गमवावी लागली आहे. मात्र, आता या चॅटजीपीटी वापरणाऱ्या एक लाखांहून अधिक लोकांचा डेटा देखील हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे.

ग्रुप-आयबी नावाच्या एका सायबर टेक्नॉलॉजी कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. ही सिंगापूरमधील कंपनी आहे. या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, चॅटजीपीटी यूजर्सचा डेटा ऑनलाईन विकला गेला आहे. (ChatGPT Data Hack)

ChatGPT Data Hack
Tech Hacks : हॅकर्स स्वप्नातही चोरू शकणार नाही तुमचा फेसबुक डेटा! वापरा फक्त ही सोपी ट्रिक

या कंपनीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे, की जगभरातील एक लाखांहून अधिक लोकांचा डेटा हॅक करण्यात आलेला आहे. यामध्ये सर्वाधिक यूजर्स हे भारतातील असल्याचंही या कंपनीने सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील १२,६३२ अकाउंट्सचा डेटा हॅक झाला आहे. भारतानंतर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान (9,217) आणि ब्राझीलचा (६,५३१) समावेश होता.

डार्क वेबवर विक्री

धक्कादायक बाब म्हणजे चोरलेला या क्रेडेन्शिअल्सची डार्क वेबवर विक्री करण्यात आली. यामध्ये आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सर्वाधिक अकाउंट्सचा सहभाग होता.

ChatGPT Data Hack
Tech Hacks : गुगल चोरू शकणार नाही तुमचा डेटा, अकाउंटमध्ये करा फक्त 'ही' सेटिंग

रेग्युलेशनची गरज

या प्रकरणामुळे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर नियंत्रणाची गरज असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. काही दिवसांपूर्वीच इलॉन मस्क, सॅम अल्टमन अशा कित्येक टेक दिग्गजांनी एआयवर निर्बंध लागू करण्याची मागणी व्यक्त केली होती. तर, युरोपियन युनियनने देखील काही दिवसांपूर्वी एआय कायदा समोर आणला होता.

ChatGPT Data Hack
Zivame : महिलांची अंतर्वस्त्रे विकणारी वेबसाईट हॅक; १५ लाख भारतीय महिलांचा खासगी डेटा विक्रीसाठी उपलब्ध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com