Zivame : महिलांची अंतर्वस्त्रे विकणारी वेबसाईट हॅक; १५ लाख भारतीय महिलांचा खासगी डेटा विक्रीसाठी उपलब्ध

यामध्ये यूजर्सचे नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, पत्ता अशा सर्व खासगी माहितीचा समावेश आहे.
Zivame Data hack
Zivame Data hackEsakal

झिवामे ही ई-कॉमर्स वेबसाईट महिलांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. महिलांची अंतर्वस्त्रे, लाऊंज वेअर, अ‍ॅक्टिव्ह वेअर आणि इतर कपड्यांचे कित्येक ऑप्शन या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. मात्र, सध्या एका वेगळ्या कारणामुळे ही साईट चर्चेत आली आहे. एका सायबर हल्ल्यात या साईटवरील यूजर्सचा डेटा हॅकर्सनी चोरल्याचं स्पष्ट झालं आहे.

ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध

हॅकर्सनी झिवामेच्या (Zivame Data hack) ग्राहकांचा डेटा ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. यामुळेच या सायबर हल्ल्याची माहिती समोर आली. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वेबसाईटचा वापर मुख्यत्वे महिलांकडून अंतर्वस्त्रांच्या खरेदीसाठी करण्यात येतो, त्यामुळे चोरलेली ही माहिती अतिशय संवेदनशील असल्याचं म्हटलं जात आहे.

१५ लाख भारतीय महिलांचा डेटा

झिवामेच्या ग्राहक असलेल्या १५ लाख भारतीय महिलांचा डेटा या सायबर हल्ल्यात चोरण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये यूजर्सचे नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, पत्ता अशा सर्व खासगी माहितीचा समावेश आहे. झिवामे ही रिलायन्स रिटेलच्या मालकीची ई-कॉमर्स वेबसाईट आहे.

Zivame Data hack
Tech Hacks : गुगल चोरू शकणार नाही तुमचा डेटा, अकाउंटमध्ये करा फक्त 'ही' सेटिंग

५०० डॉलर्सना उपलब्ध

धक्कादायक बाब म्हणजे, ही माहिती (Zivame users data) केवळ ५०० डॉलर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. हॅकिंग टीममधील एका व्यक्तीने इंडिया टुडेच्या टीमशी संवाद साधला. त्यावेळी त्याने हा डेटा विकण्यासठी क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून ५०० डॉलर्सची मागणी केली. या व्यक्तीने सॅम्पल म्हणून १,५०० यूजर्सची माहिती देखील शेअर केली.

Zivame Data hack
Mobile Hacked : आयुष्यभराची मेहनत जाऊ शकते पाण्यात; हे ५ संकेत देतील हॅक केल्याची माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, याच हॅकर्सच्या ग्रुपने यापूर्वी सुमारे ७ मिलियन लिंक्ड-इन यूजर्सचा डेटा हॅक केला होता. तसेच, रेंटोमोजो या फर्निचर रेंटिंग स्टार्टपच्या १.२१ मिलियन यूजर्सचा डेटाही यांनीच चोरून ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध केला होता.

Zivame Data hack
WhatsApp Tips : Whatsup वर झालाय हॅकर्सचा सुळसुळाट; करू नका ही चूक, मोबाईल होईल हॅक अन्...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com